Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील 321 मंडळांचे आज गणेश विसर्जन

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवाचा आज (बुधवारी, दि. 27) नववा दिवस (Chinchwad) आहे. आज पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एकूण 321 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणेश विसर्जन करणार आहेत. सर्वाधिक मंडळे दहाव्या दिवशी (गुरुवारी, दि. 28) गणेश विसर्जन करणार आहेत.

नवव्या दिवशी भोसरी, हिंजवडी आणि वाकड या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक विसर्जन मिरवणूका निघतात. त्यामुळे नवव्या दिवशी या भागावर पोलिसांचे सर्वाधिक लक्ष असते.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आपल्या मंडळाची मिरवणूक अधिक चांगली झाली पाहिजे, याची चढाओढ असते. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणारी मंडळे खास आकर्षक सजावट करतात. डीजे, ढोल ताशा, झांज आणि लेझीम पथकांना देखील यात समाविष्ट करून घेतले जाते.

Chinchwad : ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सवा’चा संदेश देत साकारली कलकत्ता येथील बेलूर मठाची  प्रतिकृती

स्थानिक प्रशासनाकडून शहरात जागोजागी कृत्रिम विसर्जन हौद बांधण्यात आले आहेत. त्यात विसर्जन करण्याची सोय केली आहे. विसर्जित झालेल्या मुर्त्यांचे संकलन तसेच निर्माल्याचे देखील संकलन केले जात आहे. आनंदी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे.

ध्वनीक्षेपकास परवानगी
विसर्जनाच्या नवव्या दिवशी ध्वनिक्षेपक रात्री बारा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आज (बुधवारी, दि. 27) रात्री बारा पर्यंत ध्वनिक्षेपक वाजतील. त्यानंतर मात्र मंडळांना (Chinchwad) आपल्या डीजेला म्युट करावे लागणार आहे.

पोलीस स्टेशन निहाय विसर्जन होणाऱ्या मंडळांची संख्या
परिमंडळ एक
पिंपरी – 18
भोसरी – 59
चिंचवड – 11
निगडी – 12
सांगवी – 14

परिमंडळ दोन
तळेगाव एमआयडीसी – 00
तळेगाव दाभाडे – 05
देहूरोड – 00
शिरगाव – 05
रावेत – 13
वाकड – 56
हिंजवडी – 60

परिमंडळ तीन
चाकण – 01
महाळुंगे एमआयडीसी – 09
आळंदी – 09
दिघी – 17
एमआयडीसी भोसरी – 18
चिखली – 14

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.