Pune : गणेश विसर्जनादिवशी या रस्त्यांवर असेल नो पार्किंग

एमपीसी न्यूज – पुण्यात उद्या (दि.28) सकाळी आठ वाजल्यापासून ( Pune)  गणेश विसर्जन मिरवणूकीला सुरुवात होणार आहे. ही मिरवणूक गुरुवारी (दि.29) सकाळपर्यंत सुरु असते. या कालावधीत अनेक नागरिक या विसर्जन मिरवणूका पाहण्यासाठी येतात. मात्र रस्ते बंद असल्याने त्यांना मिरवणूक परिसर सोडून बाहेर गाड्या पार्क कराव्या लागतात. याकालावधीत पुणे वाहतूकर पोलिसांनी शहरातील दहा मार्गावर नो पार्किंग झोन जाहीर केला आहे. म्हणजे मिरवणूक सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत या भागात पार्कींग करता येणार नाही ते मार्ग खालील प्रमाणे.

 

नो पार्किंग रोड – 

1) लक्ष्मी रोड संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक

2) केळकर रोड बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक 3) कुमठेकर रोड:- शनिपार चौक ते अलका टॉकीज चौक

4) टिळक रोड चौक ते अलका टॉकीज चौक

5) बाजीराव रोड पुरम चौक ते फुटका बुरुज चौक

6) शिवाजी रोड गाडगीळ पुतळा ते जेथे चौक

7) शास्त्री रोड:- सेनादत्त पोलीस चौकी ते अलका टॉकीज चौक

8) जंगली महाराज रोड झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक

9) कर्वे रोड – नळस्टॉप ते खंडोजीबाबा चौक

10) फर्ग्युसन कॉलेज रोड खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक

मात्र पोलीस, अग्निशामकदल, रूग्णवाहिका व एम.एस.ई.बी. यांचे वाहनांखेरीज सर्व प्रकारच्या वाहनांना मुख्य मिरवणूक असणारे खालील खंडोजीबाबा चौक ते हॉटेल वैशाली यांना जोडणा-या उपरस्त्यांचे 100 मीटर परिसरात पार्किंग करीता बंदी करण्यात येत आहे.

अशी असेल बांबु बॅरिकेडींग व्यवस्था

गणपती विसर्जन कालावधीमध्ये खालील मुख्य रस्त्यावर येणारे सर्व प्रकारचे उपरस्ते है बल्ली व बांबुच्या बॅरिकेडींगने बंद करण्यात येतील. तसेच गणपती विसर्जन मिरवणुक जशी जशी पुढे जाईल तशी तशी उपरस्त्यावरील वाहतूक सोडण्यात येईल. नमुद रस्त्यावरील प्रत्येक बल्ली व बॅरिकेडसच्या ठिकाणी वाहतूक शाखेतील अंमलदार यांची नेमणूक ( Pune) केलेली आहे.

बल्ली बॅरिकेडींगने बंद करण्यात येणारे रस्ते.

1) लक्ष्मी रोड संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक

2) केळकर रोड : बुधवार चौक से अलका टॉकीज चौक

3) कुमठेकर रोड – शनिपार चौक ते अलका टॉकीज चौक

4) टिळक रोड जेथे चौक ते अलका टॉकीज चौक

5) बाजीराव रोड पुरम चौक से फुटका बुरुज चौक

6) शिवाजी रोड गाडगीळ पुतळा ते जेथे चौक

7) शास्त्री रोड सेनादत्त पोलीस चौकी के अलका टॉकीज चौक

8) जंगली महाराज रोड झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक

9) कर्वे रोड नळस्टॉप ते खंडोजीबाबा चौक

10) फर्ग्युसन कॉलेज रोड खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक

तरी वरील प्रमाणे वाहन चालकांनी वाहतूकीसाठी बंद रोड, डायव्हर्शन पॉईट, रिंगरोड, नो पार्कींगची ठिकाण व पार्कींगची ठिकाणे यांचा वापर करून वाहतूक पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेमार्फत ( Pune) करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.