Pune : मनसे नेते प्रकाश महाजन यांनी दत्तात्रय वारे गुरुजींचे चंदन लावून धुतले पाय

एमपीसी न्यूज – वाबळेवाडीच्या  जिल्हा परिषद शाळेला (Pune) आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा बनवणारे शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे गुरुजी यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर  त्या शाळेतून त्यांचे निलंबन झाले होते. त्यांनी त्या आरोपानंतर पायात चप्पल घालणे देखील सोडुन दिले होते. मात्र,आता त्यांना त्यांच्यावर झालेल्या सर्व आरोपातून मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या आरोपाच्या वेदना सहन न झाल्याने अनवाणी राहिलेल्या पायांच्या वेदना शमविण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याच्या भावना, मनसे नेते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केल्या आहेत.

Pune : गणेश विसर्जनादिवशी या रस्त्यांवर असेल नो पार्किंग

यावेळी महाजन म्हणाले की, एवढ्या प्रामाणिक शिक्षकाला गेल्या दोन वर्षांत ज्या वेदना सहन कराव्या लागल्या. त्या वेदना आता कुठे तरी शांत व्हाव्यात. आदर्श शिक्षकाच्या पाठीशीच संपूर्ण महाराष्ट्र उभे असल्याचे देखील महाजन यांनी सांगितले आहे.

प्रकाश महाजन यांनी चंदन आणि पाणी वारे गुरुजी यांच्या पायाला लावून त्यांचे पाय धुवून सेवा केली.तसेच वारे गुरुजींना त्यांनी चप्पल घालण्याची विनंती केली, परंतु त्यांनी चप्पल घालण्याबाबतचा निर्णय वाबळेवाडी ग्रामस्थांवर (Pune) सोडला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.