Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात लक्ष्मी पूजन दिवशी 20 ठिकाणी आग

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात रविवारी (दि. 12) लक्ष्मी पूजन उत्साहात (Chinchwad) पार पडले. मात्र याच दिवशी शहरात ठिकठिकाणी आगीच्या 17 घटना घडल्या. 12 ठिकाणी घरांना आग लागली. तीन ठिकाणी दुकानाला तर एका कंपनीत आग लागली. तसेच याच दिवशी एका झाडाला देखील आग लागली. तर दिवसा दोन आगीच्या आणि एक ऑईल सांडल्याची घटना घडली. एका दिवसात ठिकठिकाणी लागलेल्या आगीमुळे अग्निशमन विभागाची चांगलीच धावपळ झाली.

Talegaon : श्री ऋषभ शांती विहार सेवा ग्रुप विहार सेवाचे टी-शर्टचे अनावरण

वेळ आणि आगीची घटना घडलेली ठिकाणे

रात्री 8.20 – जुनी सांगवी पवार नगर (घराला आग)

रात्री 8.25 – पी के स्कूल जवळ, पिंपळे सौदागर (घराला आग)

रात्री 8.54 – सुदर्शन कॉलनी, वाकड (घराला आग)

रात्री 8.56 – सी एन जी पंपाजवळ, फुगेवाडी (घराला आग)

रात्री 9.13 – सरिता गार्डन जवळ, कासारवाडी (घराला आग)

रात्री 9.32 – पीसीएमसी चौक, भोसरी (घराला आग)

रात्री 9.49 – रावेत चौक, पुनावळे (दुकानाला आग)

रात्री 9.53 – फोर के पॅलेस, चिखली (घराला आग)

रात्री 10.00 – विजडम हायस्कूल जवळ, काळेवाडी (घराला आग)

रात्री 10.48 – साई मंदिर जवळ, वडमुखवाडी (सलून दुकानाला आग)

रात्री 10.49 – साई पूजा बाग, दत्तवाडी आकुर्डी (घराला आग)

रात्री 11.23 – एम्पायर इस्टेट, चिंचवड (घराला आग)

रात्री 11.26 – कुणाल आयकॉन, पिंपळे सौदागर (झाडाला आग)

रात्री 11.38 – करिश्मा हेरिटेज, मोरवाडी (घराला आग)

मध्यरात्री 12.28 – बोऱ्हाडेवाडी, मोशी(कंपनीला आग)

मध्यरात्री 12.36 – पिंपरी मार्केट (कपड्याच्या दुकानाला आग)

पहाटे 3.32 – मारुती मंदिर जवळ, दापोडी गावठाण (घराला आग)

याशिवाय रविवारी सकाळी 10.35 वाजता सयाजी हॉटेल समोर रस्त्यावर ऑईल सांडल्याची वर्दी होती. त्यानंतर दुपारी 1.25 वाजता एच ए मैदान पिंपरी येथे गवताला आग लागली. दुपारी 2.16 वाजता अण्णासाहेब मगर स्टेडियम, पिंपरी येथे कचऱ्याला आग लागली (Chinchwad) होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.