Chinchwad : पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात घातला सिमेंटचा गट्टू, पत्नी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज –  घरगुती भांडणातून पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला आहे. ही धक्कादायक (Chinchwad)  घटना रविवारी (दि.20) पहाटे साडे पाचच्या सुमारास चिंचवड येथील गावडे चाळ येथे घडली आहे.

याप्रकऱणी निगडी पोलिसांनी आरोपी पती गणेश मोहन झोंबाडे (वय 42 रा.चिंचवड) याला अटक केली आहे. य़ाप्रकरणी जखमी महिलेच्या बहिणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Kondhwa : शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन तरुणासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण व आरोपी पती यांच्यात शनिवारी (दि.19) रात्री घरगुती कारणावरून वाद झाले.याचा राग मनात धरून आरोपीने रविवारी पहाटे साडेपाच वाजता पत्नीला मारण्याच्या उद्देशाने ती गाढ झोपेत असताना तिच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला. यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. निगडी पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली असून त्याच्यावर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल (Chinchwad) केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.