Kondhwa : शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन तरुणासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कोरोना काळात पतीचे निधन झाल्यानंतर शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन तरुणासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्या प्रकरणी एका 28 वर्षीय महिलेविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेच्या मोबाईलमध्ये दोघांच्या  संबंधाची व्हिडिओ क्लिप सापडल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाने या प्रकरणी तक्रार दिली असून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित अल्पवयीन तरुण आणि आरोपी महिला कोंढवा परिसरात राहतात. दोघेही एकमेकांचे शेजारी आहेत. कोरोना काळात या महिलेच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर ही महिला एकटीच होती. दरम्यान या महिलेने जबरदस्ती केल्याची खोटी तक्रार पोलिसात देईन अशी धमकी अल्पवयीन तरुणाला दिली आणि त्याच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. या संपूर्ण कृत्याची तिने मोबाईल मध्ये व्हिडिओ क्लिप देखील या तरुणाला काढण्यासाठी भाग पाडली. मी 2021 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला.

PMPML : पीएमपीएमएल कडून मनपा ते भोसरी या मार्गावर विनाथांबा व विनावाहक वातानुकुलीत बससेवा

दरम्यान या महिलेच्या मोबाईल मध्ये अशा प्रकारची अश्लील क्लिप असल्याचे पीडित तरुणाच्या कुटुंबीयांना समजले होते. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.