PMPML : पीएमपीएमएल कडून मनपा ते भोसरी या मार्गावर विनाथांबा व विनावाहक वातानुकुलीत बससेवा

एमपीसी न्यूज –  पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या संकल्पनेतून पुणे मनपा ते भोसरी या मार्गावर (PMPML) वातानुकूलित विनाथांबा व विनावाहक बस सेवा रविवार (दि.20) सुरु करण्यात आली आहे, त्यामुळे प्रवासी नागरिकांना जलद पोहचणे शक्य होणार असून तिकीट दर हा अन्य बस प्रमाणेच असणार आहे.

पुणे मनपा ते भोसरी या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आलेल्या भोसरी डेपो कडील वातानुकूलीत विनाथांबा व विनावाहक बस सेवेचा शुभारंभ पुणे मनपा बसस्थानक येथे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतिश गव्हाणे, कामगार व जनता संपर्क अधिकारी. सतिश गाटे, वाहतूक नियोजन अधिकारी विजय रांजणे, भोसरीचे डेपो चे डेपो मॅनेजर  भास्कर दहातोंडे, न.ता.वाडी डेपोचे डेपो मॅनेजर संतोष किरवे आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह म्हणाले की,प्रवासी नागरिकांना जलद प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने पुणे महानगर परिवहन महामंडळाने पुणे मनपा ते भोसरी या मार्गावर दोन बसच्या माध्यमातून विनाथांबा व विनावाहक बस सेवा सुरु केली आहे. प्रवासी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर बसेस मध्ये आणखी वाढ करण्यात येईल असे ते म्हणाले.

तरी पुणे मनपा ते भोसरी या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवासी नागरिकांनी पीएमपीएमएल च्या किफायतशीर (PMPML) दरात असणाऱ्या वातानुकूलीत विनाथांबा व विनावाहक बस सेवेचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा असे घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.