Pune : आता पीएमपीएमएलची पर्यटन बस सेवा खारावडे म्हसोबा , टेमघर धरण, निळकंठेश्वर येथेही…

एमपीसी न्यूज –  पीएमपीएमएलच्या शनिवारी, रविवारी सुरु केलेल्या पर्यटन बससेवेला ( Pune ) नागरिकांचा चांगालाच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पीएमपीएमएल या पर्यटन बससेवेमध्ये पुण्याजवळील विविध पर्यटन स्थळांचा समावेश करत आहे. त्यानुसार रविवारी (दि.20) आणखी एका बस सेवेला डेक्कन जिमखाना येथून सुरुवात करण्यात आली. यामध्ये खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा या पर्यटन स्थळांसाठी नव्याने समावेश कऱण्यात आला आहे.

पर्यटन बससेवा क्र. 3 चा शुभारंभ पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतीश गव्हाणे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, वाहतूक नियोजन अधिकारी विजय रांजणे, न.ता.वाडी डेपोचे डेपो मॅनेजर संतोष किरवे, पुणे स्टेशन डेपोचे डेपो मॅनेजर संजय कुसाळकर आदी उपस्थित होते.

Pimpri : गणेशोत्सव मंडपाच्या खड्ड्यांसाठी दर आकारणी रद्द करावी – अमित गोरखे

पीएमपीएमएलच्या डेक्कन जिमखाना बसस्थानक येथे वातानुकूलित ई-बस ला हिरवा झेंडा दाखवून पर्यटन बससेवा क्र. 3 चा शुभारंभ करण्यात आला. पर्यटन बससेवा क्र. 3 द्वारे पहिल्याच दिवशी 25 पर्यटकांनी सफर केली.

पुणे दर्शन बस सेवेच्या धर्तीवर पुणे व पिंपरी चिंचवड शहरानजीकच्या धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता 7 पर्यटन बस मार्ग निश्चित केले असून वातानुकूलीत बसेसव्दारे विशेष पर्यटन बस सेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी 1 मे 2023 पोसून सुरु केली आहे.

यासाठी पर्यटकांना 500 रुपये प्रवासी तिकीटदर ( Pune ) आकारण्यात येतो.तरी पीएमपीएमएल च्या किफायतशीर दरात असणाऱ्या पर्यटन बससेवेचा लाभ जास्तीत जास्त पर्यटकांनी घ्यावा असे घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

असा असेल पर्यटन बससेवा क्र. 3 चा मार्ग –

मार्ग – डेक्कन जिमखाना, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन जिमखाना.

 बस सुटण्याची वेळ – सकाळी 9 वाजता

 बस पोहोचण्याची वेळ – दुपारी पाच वाजता

 बसचा पहिला व शेवटचा थांबा – डेक्कन जिमखाना बस स्थानक.

 प्रति प्रवासी तिकीट दर – 500 रूपये

 बुकिंग ठिकाण – 1)डेक्कन जिमखाना, 2) पुणे स्टेशन, 3) स्वारगेट, 4) कात्रज, 5) हडपसर गाडीतळ,6) भोसरी बसस्थानक,7) निगडी, 8) मनपा भवन या महामंडळाच्या पास केंद्रावरून.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.