Pimpri : गणेशोत्सव मंडपाच्या खड्ड्यांसाठी दर आकारणी रद्द करावी – अमित गोरखे

एमपीसी न्यूज – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडप उभारणीसाठी खड्डे खोदताना दर ( Pimpri ) आकारणी केली जाते. सार्वजनिक गणेश मंडळांकडून ही दर आकारणी करू नये. तसेच मनपा व पोलिस प्रशासनाने परवानगीची प्रक्रिया व नियमावली सुकर करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे  पिंपरी निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

अमित गोरखे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडे विविध गोष्टींसाठी परवानगी घ्यावी लागते.यामध्ये मनपा प्रशासन खड्डे घेण्यासाठी परवानगीबरोबर दर आकारणी करते. हे दर आकारले जाऊ नयेत. उत्सवासाठी गणेश मंडळांना ही सवलत देण्यात द्यावी.

Chinchwad : पवना नदी पुन्हा फेसाळली!

शहरातील गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित, उत्साह आणि भक्तीमय वातावरणात साजरा व्हावा. या करिता पिंपरी चिंचवड मनपा आणि  पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयामार्फत एक खिडकी योजना राबविण्यात यावी. यासह नियमावली सुकर करून गणेश मंडळांना सहकार्य करावे.  या करिता मनपा प्रशासनाने वेळीच नियोजन करावे. गणेशोत्सव जवळ येत असल्यामुळे प्रशासनाने तातडीने यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी नमूद केले आहे.

– खड्डेमुक्त मंडपासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा

गणेश मंडळाकडून मंडप उभारणीसाठी रस्त्यात खड्डे केले जातात. त्या खड्ड्यामुले रस्त्यांची दुरावस्था होते. त्याकरिता पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाने शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना खड्डेमुक्त मंडप उभारणीसाठी आवाहन करावे. गणेश मंडळाच्या पदाधिका-यांनी देखील खड्डेमुक्त मंडप उभारणी करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन अमित गोरखे यांनी मंडळांना केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.