Chinchwad : पवना नदी पुन्हा फेसाळली!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी पवना नदी पुन्हा (Chinchwad) फेसाळली आहे. थेरगाव केजूदेवी बंधाऱ्याजवळ पाण्यावर फेस तरंगत आहेत. यंदाच्या पावसाळ्यात तीनवेळा नदी फेसाळली आहे. याकडे महापालिका प्रशासन, पर्यावरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यावरणवादी करत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीची महापालिका हद्दीतील लांबी 24.34 किलोमीटर, इंद्रायणी नदीची एकूण लांबी 20.85  किलोमीटर आहे. तर मुळा नदी शहराच्या सीमेवरून 10 किलोमीटर अंतर वाहते.

Pune : पुणे पोलिसांकडून आठ महिन्यात 297 आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई

तळवडेपासून च-होलीपर्यंत इंद्रायणी नदीचे प्रदूषण वाढले आहे. तर, किवळेपासून दापोडीपर्यंत पवना नदीचे प्रदूषण वाढले आहे.  नदीलगतच्या भागात किवळे, पुनावळे, रावेत, ताथवडे, वाल्हेकरवाडी, थेरगाव, चिंचवडगाव, काळेवाडी, पिंपरी, दापोडी, पिंपळेगुरव, सांगवी, कासारवाडी व दापोडीपर्यंत पाण्याचे प्रदूषण वाढल्याचे दिसून येते.

पवना नदी सातत्याने फेसाळत आहे. नदीतील पाण्यावर फेस तरंगतो. नदी प्रदूषित झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत तीनवेळा नदी फेसाळली आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीन नदी पात्रातील जलपर्णी काढण्याची ठेकेदारांची मुदत संपूनही पात्रात अनेक ठिकाणी जलपर्णी जैसे थे दिसत आहे.

तीन नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी चार कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आला आहे. मात्र, नद्या जलपर्णीमुक्त झाल्या नाहीत. दरम्यान,  नागरिक बंधा-यावर  कपडे धुतात. कपडे धुतल्याने पाणी फेसाळल्याचे सांगत महापालिका प्रशासन हातवर करते. कठोर कारवाई, ठोस उपाययोजना करत नाही. त्यामुळे पर्यावरणवादी नाराजी व्यक्त करत (Chinchwad) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.