Chinchwad : जुगार अड्ड्यावर छापा; आठ जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – चिंचवड येथे राजरोसपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जणांना अटक करण्यात आली. चिंचवड पोलिसांनी सोमवारी (दि. 29) रात्री आठच्या सुमारास ही कारवाई केली.

वासू नागाप्पा नायक, बाळासाहेब लिंगशेट्टी पाटील, व्यंकटेश तिंपप्पा लावरे, उमर इब्राहिम शेख, जावेद बुडन खान, बसवराज शंकर आसादे, विश्वनाथ अमिनाप्पा भोई आणि रविराज विलास रसाळ यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील शॉप ऍक्ट कार्यालयाच्या मागे एक जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी नायक आणि पाटील हे दोघे मटका घेत असल्याचे दिसून आले. तर इतर सहाजण जुगार खेळत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 800 रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम मिळून आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.