Chinchwad : माणसातील माणूसपण जपा -मेघना झुझम

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय व कनिष्ठ व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालातील विद्यार्थ्यांच्या निबंध, वकृत्व, कविता वाचन, वाचन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे पारितोषिक वितरण अभिनेत्री मेघना झुझम यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी झुझम बोलत होत्या.

यावेळी संस्थेचे सचिव दीपक शहा, संस्थेचे विशेष प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता कुर्‍हाडे, एमबीए विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे उपस्थित होते.

मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, या हेतूने मराठी भाषा विभागाकडून एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अभिनेत्री मेघना झुझम यांनी ‘मी सावित्रीफुले बोलतेय’, या विषयावर एकपात्री नाटक सादर केले.सावित्रीबाईंचा जीवनपट मांडताना त्या म्हणाल्या, घराघरातील मुले शिकली पाहिजे. ही काळाजी गरज आहे.

माणसातील माणूसपण प्रत्येकाने जपले पाहिजे. एकमेकांबद्दल आदर व्यक्त केला पाहिजे. अंधश्रद्धेमध्ये अडकून राहू नका, सकारात्मक विचाराने आपले ध्येय गाठावे, असे आवाहन करत सावित्रीबाई फुलें यांची कथा आणि व्यथा आपल्या अभिनयातून त्यांनी सादर केली.

यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुरेखा कुंभार यांनी केले तर सूत्रसंचालन विद्यार्थीनी श्रृती व अंकित यांनी केले. प्राचार्या डॉ. प्राचार्या पोर्णिमा कदम यांनी आभार प्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.