Bhosari : संत साई हायस्कूलमध्ये महिला दिन उत्साहात

एमपीसी न्यूज – भोसरी येथील संत साई हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध कार्यक्रम आणि व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच विषेश पुरस्कार देऊन महिलांचा सत्कार करण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक शिवलिंग ढवळेशवर यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते . कार्यक्रमाची सुरूवात पूजा लांडगे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलनाने पार पडली  त्यानंतर उनमुक्त युथ फाऊंडेशनच्या वतीने ऋषिकेश तपशालकर यांनी प्रात्यक्षिकाद्वारे महिलांसाठी कचरा व्यवस्थापनाचे थडे दिले.

याप्रसंगी विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या  सायली  शेलार, अर्चना  कांकरिया,  लीना गायकवाड, माधुरी काळे व शाळेच्या संस्थापक व मुख्यध्यापिका सुनिता ढवळेश्वर यांचा पूजा लांडगे यांच्या हस्ते शाल, बुके व सम्मान चिन्ह देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला.
भागवत वानखेडे यांनी “स्त्री जन्मा तुझी कहाणी” या विषयावर प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल पुडे व विद्यार्थी सयंम पटनी आणि अथर्व नलावडे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काशिनाथ कत्नळी,प्रमोद शिंदे, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परीश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.