Chinchwad :राज्यस्तरीय खेलो इंडिया स्पर्धेत श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील विकास शिक्षण मंडळ (Chinchwad)संचालित श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी राज्यस्तरीय खेलो इंडिया स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खेलो इंडिया स्पर्धा खराडी पुणे येथे (Chinchwad)पार पडल्या या स्पर्धेमध्ये श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी किक बॉक्सिंग या प्रकारामध्ये 55 किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी केली व त्यांची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.खेलो इंडिया किक बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक गिरीजा शशिकांत माने, द्वितीय क्रमांक आर्या सुनील भेके हिने पटकावला आहे. या विजयामुळे या दोघींची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

Pune :आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेला पुण्यात सुरुवात

विद्यार्थीनींनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव, संचालक विजय जाधव, यांनी सर्व विद्यार्थिनींचे कौतुक केले.तसेचप्राचार्य बाळाराम पाटील, मुख्याध्यापक प्राथमिक साहेबराव देवरे,पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उपमुख्याध्यापक किसन अहिरे, कमिटी मेंबर मनीषा जाधव, सुषमा संधान, छाया ओव्हाळ, क्रीडा शिक्षक शब्बीर मोमीन यांनी पुढील स्पर्धेकरिता विद्यार्थींनींना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.