Nigadi : ‘गीता पठण स्पर्धेचे’ बक्षीस वितरण संपन्न

एमपीसी न्यूज – भगवद्गीता हा केवळ एक(Nigadi) धार्मिक ग्रंथ नसून तो ‘व्यक्ती निर्माणाची कला’ आणि ‘जीवनाचे विज्ञान’ उलगडून दाखविणारा एक मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. विद्यार्थ्याना आपल्या राष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा परिचय व्हावा आणि त्यापासून प्रेरित होऊन आपल्या राष्ट्राचे समर्थ नागरिक घडताना विश्वबंधुत्वाचे नाते निर्माण व्हावे, या उद्देशाने ‘गीता पठण स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला.

परमपूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंदजीपासून(Nigadi) प्रेरणा घेऊन प्रारंभ झालेल्या चिन्मय मिशन संस्थेतर्फे प्रतिवर्षी ‘गीता पठण स्पर्धेचे आयोजन स्वामी स्वरूपानंदजींच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येते. गेले तीन महिने पिंपरी चिंचवड भागातील 47 शाळांनी शालेय स्तरावरील प्राथमिक फेरीत आपल्या विद्यार्थ्याना सहभागी करून घेतले होते, अडीच हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. त्यापैकी या प्रथम फेरीत निवडण्यात आलेले 388 विद्यार्थी अंतिम फेरीत पोहचले . या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी मनोहर वाढोकर सभागृह, प्राधिकरण निगडी येथे संपन्न झाला.

Pune :आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेला पुण्यात सुरुवात

या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून माऊली संस्थान आळंदीचे माजी विश्वस्त अभय टिळक यांनी मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्षस्थानी चिन्मय मिशनच्या लोहगाव स्थित चिन्मय माऊली आश्रमाच्या मुख्य ब्रह्मचारीणी मैत्रेयी चैतन्यजी होत्या. मुलांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या “श्रीकृष्णाला आपले मित्र बनवल्यावर आयुष्य कसं आनंदी करता येईल हे सांगतले व त्या अनुषंगाने पालकांशी देखील संवाद साधला. यावेळी चिन्मय मिशन पुणेचे अध्यक्ष प्रदीप श्रीवास्तव हे देखील उपस्थित होते यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.

स्पर्धेचा निकाल गटानुसार जाहीर करण्यात आला. एकूण 11 विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकवला

अ- भक्ती कब्रुवार (गणेश इंटरनॅशनल स्कूल, चिखली); राघव इनामदार ( एस बी पाटील इंग्लिश मीडियम

स्कूल, रावेत); गार्गी विशाल आराध्ये (अमृता विद्यालय, यमुनानगर)

गट ब श्रीवेद अतुल केसरकर (ज्ञान प्रबोधिनी, निगडी); धन्विन जितेंद्र राणे (मॉडर्न मराठी माध्यम

शाळा, यमुनानगर)

गट क स्वराज राक्षे ( प्रेरणा पूर्व माध्यमिक विद्यालय, निगडी)

गट ड अर्णव वाघ-खुला गट (पोतदार इंटरनॅशनल स्कूल)

गट इ- शर्वरी भारत कोकणे (गुरुकुल ज्ञान प्रबोधिनी, निगडी); मिहीर काळे (एसपीएम इंग्लिश मीडियम

स्कूल, यमुनानगर); सॅड्रा गुप्तन (प्रियदर्शिनी स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, भोसरी)

गट फ- अवनी डी. चौधरी , ज्ञानदीप विद्यालय रुपीनगर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.