PMPML : क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! पुण्यातील वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यांसाठी पीएमपीएमएलने जाता येणार

एमपीसी न्यूज – वर्ल्ड कप क्रिकेट सामने सुरु आहेत. त्यातील (PMPML)पाच सामने पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडीयमवर होणार आहेत. स्टेडीयमवर जाण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहतूक सेवा नसल्याने पीएमपीएमएलने क्रिकेट प्रेमींसाठी खास सोय केली आहे. पुणे महापालिका भवन, कात्रज आणि निगडी या तीन ठिकाणावरून गहुंजे स्टेडीयमसाठी विशेष बस सोडण्यात येणार आहेत.

आयसीसी वर्ल्ड कप क्रिकेट सामने सुरु आहेत. त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये( PMPML)आनंदाचे वातावरण आहे. पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडीयमवर यातील पाच सामने होणार आहेत. त्यामुळे अनेकांनी हे सामने पाहायला जाण्याची तयारी केली आहे. मात्र ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही, अशा क्रिकेट प्रेमींची मात्र निराशा झाली होती. मात्र आता ती निराशा पीएमपीएमएलने दूर केली आहे. पुणे महापालिका भवन, कात्रज आणि निगडी येथून स्टेडीयमला जाण्यासाठी विशेष बस सोडण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला आहे.

एवढे असेल तिकीट
पुणे महापालिका भवन ते गहुंजे स्टेडीयम आणि कात्रज ते गहुंजे स्टेडीयम दरम्यान एकेरी मार्गावर 100 रुपये तर निगडी ते गहुंजे स्टेडीयम दरम्यान एकेरी मार्गावर 50 रुपये तिकीट असणार आहे.

बस सुटण्याची वेळ
19 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर, 1 ऑक्टोबर आणि 8 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता सामने सुरु होणार असल्याने पुणे महापालिका भवन येथून सकाळी 11.00, 11.35 आणि दुपारी 12.05 वाजता तीन बस सुटतील. या चार दिवशी निगडी बस स्थानकावरून दुपारी 12.00 आणि 12.30 वाजता तर कात्रज येथून सकाळी 11.00, 11.30 वाजता बस सुटणार आहेत.

11 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता सामना सुरु होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी पुणे महापालिका भवन येथून सकाळी 8.25, 8.50 आणि 9.05 वाजता, कात्रज येथून 8.15 आणि 8.35 वाजता तर निगडी येथून 8.30 आणि 9.00 वाजता बस सुटतील.

पुणे येथे होणारे वर्ल्ड कप क्रिकेट सामने
19 ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश (दुपारी दोन वाजता)
30 ऑक्टोबर – अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका (दुपारी दोन वाजता)
1 नोव्हेंबर – न्यूझीलंड विरुद्ध साउथ आफ्रिका (दुपारी दोन वाजता)
8 नोव्हेंबर – इंग्लंड विरुद्ध नेदरलंड (दुपारी दोन वाजता)
11 नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (सकाळी साडेदहा वाजता)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.