Wagholi :वाघोली येथे फर्निचरच्या दुकानाला आग

एमपीसी न्यूज – वाघोली येथील भगवान चौकातील(Wagholi) गुरु नानक फर्निचर या फर्निचरच्या दुकानाला आज (बुधवारी) सकाळी पावणे बाराच्या सुमारास आग लागली. यामध्ये कोणतीही जखमी किंवा जिवीत हानी झाली नसून दुकानातूल साहित्य मात्र जळून खाक झाले आहे.

वाघोली अग्निशमन केंद्राकडून दोन अग्निशमन गाड्या या(Wagholi) घटनासथळी दाखल झाल्या होत्या. यावेळी प्रसांगवधान राखत घटनास्थळावरून 3 गॅस सिलेंडर बाजूला काढल्याने मोठा धोका टळला. या आगीत दुकान मधील गादी ,करपेट ,ग्रीन ग्रास , व्हॉल पेपर , सोफा यांचे साहित्य जळून खाक झाले. दुकानाला लागून न्यू बॉंबे हॉटेल होते त्या हॉटेल मधून 3 गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात आले आहे. आगीचे कारण आद्यप काही काळू शकले नाही ,त्याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहेत.

Nigadi : ‘गीता पठण स्पर्धेचे’ बक्षीस वितरण संपन्न

हि कारवाई पीएमआरडीएचे अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी.देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन फायरमन सुरज इंगवले, प्रशांत चव्हाण, सचिन गवळी, विकास पालवे,रिजवान फरास ,अभिजित दराडे , मयुर गोसावी तसेच वाहन चालक अल्ताब पटेल, नितीन माने यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.