Vadgaon Maval : तालुक्यातील ग्रामपंचायतींसह मावळ लोकसभा जिंकण्याचा मनसेचा निर्धार

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत(Vadgaon Maval) निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरायचे. ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकवायचा. त्याचबरोबर मावळ लोकसभेसाठी देखील पूर्ण ताकदीने लढायचे, असा निर्धार मनसेने आढावा बैठकीत केला. मंगळवारी (दि. 10) वडगाव येथील मावळगड कार्यालयात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते हा निर्धार करण्यात आला.

बैठकीत मनसेचे सरचिटणीस रणजीत शिरोळे, सरचिटणीस अमेय खोपकर, शहराध्यक्ष तथा गटनेते सचिन चिखले यांनी मार्गदर्शन केले.

Wagholi :वाघोली येथे फर्निचरच्या दुकानाला आग

मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या नियोजनानुसार(Vadgaon Maval) पार पडलेल्या आढावा बैठकीत मनसे पक्षसंघटना बांधणी व विस्तार, राज ठाकरे यांचे रोखठोक विचार, पक्षाची ध्येयधोरणे मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. नागरिकांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना करण्यात आल्या.

सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकजुटीने आपल्यातील सर्व मतभेद बाजूला ठेवून आगामी लोकसभा व ग्रामपंचायत निवडणुक पुर्ण ताकदीने लढण्यासाठी सज्ज व्हावे, असा निर्धार देखील सर्वांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.