Pune :आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेला पुण्यात सुरुवात

एमपीसी न्यूज – मातृभाषा अध्यापक संस्था, पुणे.आणि मराठी एकीकरण समिती,(Pune)पुणे.यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेचा विकास ,संवर्धन आणि विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजीत केली जाते.

यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनव विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी(Pune) अभिनेत्री ऐश्वर्या तुपे, मातृभाषा अध्यापक संस्थेच्या सचिव.संध्या माने, उपसचिव वंदना आणेकर,कार्याध्यक्षा शामला पंडित,कार्याध्यक्षा सुरेखा लेंभे, संचालक शारदा पानगे उपस्थित होते. यावेळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून मंजुषा जोशी,शंकर घोरपडे, लिनी फडके, शंकर घोरपडे, कल्याणी कुलकर्णी, राधा रांगोळे यांनी काम पाहिले.

Chinchwad : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर कार्यध्यक्षपदी सागर तापकीर

यावेळी मातृभाषा अध्यापक संस्थेच्या अध्यक्षा स्मिता ओव्हाळ(Pune)यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली.मराठी भाषा संवर्धन व विकास यासाठी अहोरात्र कार्यरत रहाणारे संस्थेचे सल्लागार.हनुमंत कुबडे यांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांनीही स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाला म.ए.सो.भावे स्कूलचे पर्यवेक्षक जायभाय तसेच कदम यांनी सहकार्य केले. संस्थेच्या उपसचिव वंदना आणेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनव विद्यालया ची विद्यार्थिनी ईश्वरी व्यवहारे हिने केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.