Chikhali : प्रेस मशीन वर काम करताना कामगाराची बोटे कापली, कंपनी मालक,व्यवस्थापक व डॉक्टरवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मशीन चे ज्ञान नसताना कामगाराला (Chikhali) मशीनवर काम करण्यास सांगितले. यावेळी कामगाराची बोटे कापली गेली. यावरून कंपनी मालक,व्यवस्थापक, सुपरवयजर व डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात 12 सप्टेंबर रोजी चिखली येथील श्री मेहेर ऑटो पार्ट इंडस्ट्रीज इंडस्ट्रीज येथे घडला आहे.

याप्रकरणी रवींद्र बाबुराव जयस्वाल (वय 20 रा चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.10)फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी कंपनीचे मालक तसेच कंपनीचे व्यवस्थापक प्रेम सिंग, सुपरवायझर परवेज व विंध्य ग्रेस हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे .

Pune : 13 ते 15 ऑक्टोबर दरम्यान कोरियन कला प्रदर्शनाचे आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Chikhali )यांना मशीनचे कोणते ही ज्ञान नसताना प्रेस मशीन वर ऑपरेटिंग चे काम दिले. यावेळी सुरक्षेचे साहित्य व सुविधा देण्यात आल्या नाहीत. काम करत असताना फिर्यादी यांच्या हातावर प्रेस मशीनचे डाय पडून फिर्यादीच्या हाताची तीन बोटे कापली गेली.

यावेळी उपचारासाठी दवाखान्यात नेले असता विंध्य ग्रेस हॉस्पिटलचे डॉक्टर यांनी याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर उपचाराचे कागदपत्रे कंपनी मालकाला दिली. यावरून चिखली पोलीस ठाण्यात कंपनीचे मालक व्यवस्थापक सुपरवायझर व संबंधित डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.