Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील तीन खेळाडूंना नेमबाजी स्पर्धेत पाच सुवर्ण पदके

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य पोलीस नेमबाजी स्पर्धा 20 ते 26 डिसेंबर या (Chinchwad) कालावधीत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1, वडाचीवाडी शुटींग रेंज हडपसर आणि शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे पार पडल्या. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील तीन खेळाडूंनी पाच सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवले.

रश्मी स्वप्नील धावडे (नेमणूक – विशेष शाखा) यांनी 10 मीटर पिस्टल आणि 25 मीटर पिस्टल या दोन्ही प्रकारात सुवर्ण पदक मिळवले. पोलीस अंमलदार पूनम प्रकाश लांडे (नेमणूक – दिघी पोलीस स्टेशन) यांनी 10 मीटर एअर रायफल या प्रकारात रौप्य पदक मिळवले.

पोलीस अंमलदार परवीन मेहबूब पठाण (नेमणूक – वाहतूक शाखा) यांनी 50 मीटर रायफल प्रोन पोझिशन, 50 मीटर रायफल थ्री पोझिशन आणि 300 मीटर रायफल थ्री पोझिशन या तीन प्रकारात सुवर्ण पदकांची कमाई केली. तर वडाचीवाडी शुटींग रेंज येथे झालेल्या महिला व पुरुष एकत्रित स्पर्धेत 300 मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात कांस्य पदक मिळवले.

Katraj : नवीन कात्रज बोगद्यात अपघात; अचानक एक गाडी थांबल्याने मागील पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या

या कामगिरीमुळे परवीन मेहबूब पठाण यांची ऑल इंडिया पोलीस नेमबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य (Chinchwad) पोलीस संघात निवड झाली आहे. शहर पोलीस दलातील तीन महिला खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.