Katraj : नवीन कात्रज बोगद्यात अपघात; अचानक एक गाडी थांबल्याने मागील पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या

एमपीसी न्यूज : कात्रज नवीन बोगद्याच्या आतमध्ये दुरुस्तीचे (Katraj ) काम चालू असताना एक वाहन अचानक थांबल्यामुळे त्याच्या पाठीमागे असलेल्या वाहनांचा अपघात झाला. या वाहनाच्या पाठी असलेली चार ते पाच वाहने एकमेकांवर आदळली. यामध्ये कोणीही जखमी नसून वाहनांचे नुकसान झालेले आहे. 

वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत आहे. घटनास्थळी भारती विद्यापीठचे Api पाटील व स्टाफ तसेच वाहतूक विभागाकडील अंमलदार हजर आहेत. अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.