Pune : घोरपडी पेठेतील सांडपाणी गटाराचे काम पूर्ण – हेमंत रासने

एमपीसी न्यूज – घोरपडी पेठेतील मोमीनपुरा (Pune) येथील झोरा कॉम्प्लेक्स ते चांद तारा चौक, तेनोबल स्कूलपर्यंत गेली आठ दिवसांपासून सांडपाण्याचे गटार पूर्ण भरून वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. स्थानिक नागरिक व कार्यकर्ते यांच्याकडून तक्रार आल्यानंतर पुणे महानगरपालिका अधिकारी यांच्या समवेत त्या ठिकाणी जाऊन पहाणी केली. आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली.

यासाठी मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार. आम्ही आलो काम झालं, सबका साथ सबका विकास, असल्याची भावना स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी व्यक्त केली.

Katraj : नवीन कात्रज बोगद्यात अपघात; अचानक एक गाडी थांबल्याने मागील पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या

यावेळी मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, प्रभाग अध्यक्ष अभिजीत रजपूत, छगन बुलाखे, निर्मल हरिहर, जयदीप शिंदे, संकेत थोपटे, सिद्धेश पांडे, जयदीप शिंदे तसेच पुणे शहर अप्लसंख्यांक आघाडी प्रमुख तज्जमुल पठाण, शाहरुख अत्तार, खालील अत्तार, अजिज भाई, इशतियाक शेख आदी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.