Dehuroad : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- देहूरोड येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील (Dehuroad) दोघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि.27) रात्री घडला. याप्रकरणी गणेश रामचंद्र राजीवडे (वय 42, रा. आणेफाटा मावळ ) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीवरून पोलिसांनी शमशाद अब्दुल सलीम अहमद (वय 28, उत्तर प्रदेश) या ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात शेखर प्रभाकर सातपुते (वय 45) व राजेंद्र बाळू किरवे (वय 30) या दोघांचा मृत्यू झाला आहे.

Katraj : नवीन कात्रज बोगद्यात अपघात; अचानक एक गाडी थांबल्याने मागील पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मेहुणे शेखर सातपुते हे त्यांचा मित्र राजेंद्र किरवे यांना घेऊन एका मिस्त्री कामासाठी तळेगाव दाभाडे इथून मुळशीकडे जात होते. यावेळी देहूरोड येथे सेंट्रल चौकाकडून वाकडच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रकने फिर्यादी यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली.

या अपघातात शेखर व त्यांचे मित्र राजेंद्र हे दोघेही रस्त्यावर जोरात आपटले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. यातच दोघांचाही अपघातात (Dehuroad) मृत्यू झाला. यावेळी ट्रक चालक तेथे थांबून त्यांना कोणतीही मदत न करता तिथून फरार झाला. यावरून देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.