Mumbai : वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्याची चर्चा अंतिम टप्प्यात; शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे अनुकूल – संजय राऊत

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने (Mumbai) वंचितचा इंडिया आघाडीत समावेश करण्यासाठी उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय काँग्रेसचे दिल्लीतील नेते हे सकारात्मक आहेत. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला विरोधकांच्या इंडिया आघाडीत घेण्याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याबाबत निर्णय होणार आहे, अशी माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

मुंबई येथे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांची संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. संजय राऊत म्हणाले, वंचित आघाडीचा फोर्स सोबत घेण्याची गरज आहे. त्याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी त्याला संमती दिली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची वंचित बहुजन आघाडी सोबत युती आधीच झालेली आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत समावेश करण्याबाबत इंडिया आघाडीकडे शब्द टाकला आहे.

Hinjawadi : हिंजवडी ग्रामपंचायत मासिक सभेत सभासदांमध्ये वाद, ग्रामपंचायत सदस्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वंचितचा इंडिया आघाडीत समावेश करण्यासाठी उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय काँग्रेसचे दिल्लीतील नेते हे सकारात्मक असुन (Mumbai) त्याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. प्रकाश आंबेडकर यांचं नेतृत्व महाराष्ट्रात आहे. त्यांची भूमिका या देशातून हुकूमशाही कायमची नष्ट करावी अशी आहे. डॉ. बाबासाहेबांची भूमिका ते मांडताहेत, आम्हीही डॉ. बाबासाहेबांची भूमिका मांडतोय त्यामुळे याबाबत चर्चा सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.