Chinchwad : शहर पोलीस दलातील सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत नेमणुका

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत नेमणूक (Chinchwad)  करण्यात आल्या आहेत. राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नती झाल्यानंतर शहरात आलेल्या सहाय्यक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये वाहतूक विभागासाठी दोन सहाय्यक आयुक्त देण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश शुक्रवारी (दि. 3) रात्री पोलीस आयुक्तांनी दिले.

Pimpri : पिंपरी चिंचवड प्लास्टिक असोसिएशनच्या “प्लास्टो फोकस प्रक्षेपण” कार्यक्रमास उदंड प्रतिसाद

सहाय्यक पोलीस आयुक्त भास्कर डेरे यांच्याकडे प्रशासन विभागाची जबाबदारी होती. त्यांची नेमणूक वाहतूक शाखेत करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे यांची देखील वाहतूक शाखेत नेमणूक करण्यात आली आहे.

तर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांची सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग येथे नेमणूक झाली आहे.
पदोन्नती झाल्यानंतर नव्याने शहरात दाखल झालेले मुकुट लाल पाटील यांच्याकडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर सहायक पोलीस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर यांच्याकडे भोसरी एमआयडीसी विभागाची जबाबदारी (Chinchwad)  देण्यात आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.