Alandi News : शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याची सीआयडी चौकशी करावी – ॲड. तापकीर

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची सीआयडी मार्फत तात्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी केली आहे.

या बाबत ॲड. तापकीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना ईमेल पाठवून या हल्ल्याच्या घटनेची सीआयडी मार्फत तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ॲड. तापकीर यांनी केली आहे.

सकृत दर्शनी ॲड. गुणवंत सदावर्ते यांचा यात सहभाग असून त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी, ॲड. सदावर्ते यांच्या या कृत्यामुळे महाराष्ट्रातील वकील वर्गाची प्रतिष्ठा कमी होत असून त्यांच्या या कृत्यामुळे वकील वर्गाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. याचा विचार करून महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने त्यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई व कायदेशीर कारवाई करून महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने त्यांची वकिलीची सनद स्थगित व रद्द करावी, अशी मागणी तापकीर यांनी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलकडे केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.