Gahunje News: गहुंजे स्टेडियमजवळ स्कोडा कारचा भीषण अपघात, चार जण जागीच ठार 

एमपीसी न्यूज – पुणे- मुंबई एक्सप्रेस वेवर गहुंजे येथे स्कोडा कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले. आज (शनिवारी, दि.09) दुपारी तीन वाजता हा अपघात झाला. भरधाव कार रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकला धडकून हा अपघात झाला. 

याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी की, आज दुपारी तीनच्या सुमारास स्कोडा कार भरधाव वेगाने जात असताना रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा चुराडा झाला असून, आतमधील चारही जण जागीच ठार झाले आहेत.

घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. मयत इसम यांची माहिती घेतली जात आहे.

(सविस्तर बातमी थोड्याच वेळात) 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.