Pimpri News : नागरिकांनो सावध रहा, पोलिसांना सहकार्य करा, एकत्र मिळून गुन्हे आटोक्यात आणू – पोलीस आयुक्त

एमपीसी न्यूज : नागरिकांनी सावध राहिले व साधनांचा वापर केला तर नागरिक व पोलीस मिळून शहरातील वाढती  गुन्हेगारी कमी करू शकतो असे मत (Pimpri News) पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी व्यक्त केले. मंगळवारी निगडी येथे फिर्यादींना त्यांचा चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्यात आला त्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

चौबे म्हणाले की, पोलीस विविध प्रकारचे गुन्हे उघडकीस आणतात. यामध्ये प्रोफेशनल क्राईम मधून केलेल्या चोऱ्या डिटेक्ट करणे अवघड असते. यातील काही गुन्हेगार परराज्यात पळूण जातात. काही जण उत्तरेतील राज्ये जसे बिहार, उत्तर प्रदेश व बंगाल येथे जातात तर काही दक्षिणेकडील राज्यात जसे तेलंगणा व कर्नाटक येथे जातात. तेथे आपली पोलिस पथके जाऊन त्यांना पकडतात. 24 तासाच्या आत कोर्टात हजर केल्या नंतर त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करतात. त्यानंतर कोर्टाकडून शिक्षा मिळाल्या नंतर त्यांना जेल मध्ये पाठवण्यात येते.

ते पुढे म्हणाले की, ” आपण सावध राहिलो व काळजी घेतली तर प्रोफेशनल चोरांना अशा प्रकारचे गुन्हे करायला संधी मिळणार नाही. नागरिकांनी निर्जनस्थळी वॉकिंग साठी जाऊ नये. जेणे करून चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे घडणार नाहीत. घराला चांगल्या प्रतीचे दरवाजे व टाळे लावावेत. महागडे दागिने घरी ठेवण्या ऐवजी लॉकरमध्ये ठेवावेत, घरी कॅश ठेवण्याऐवजी आर्थिक व्यवहार यूपीआय/ कार्डचा वापर करून करावे.  सध्या सीसीटीव्ही कॅमेरे कमी मिळत आहेत त्यामुळे बाहेरगावी जाताना घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. आय पी व सिम बेस सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत जेणेकरून तुम्ही बाहेरगावी असला तरी घरी काय चाललंय ते 24 तास पाहू शकता. तसेच दुकान मध्ये अलार्म लावावेत. चोर चोरी करण्यास आल्यावर हे अलार्म जोराने वाजतील व लोक चोरांना पकडू शकतील. नागरिक व पोलीस दोघे मिळून गुन्हे वाढीचा दर कमी करू असं ते म्हणाले.

Pimpri News : पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार कुस्ती स्पर्धेसाठी महापालिकेचे 25 लाखांचे अर्थसहाय्य

आज जानेवारी 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलात महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्ताने विविध उपक्रम राबवले जात आहेत. महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे चे औचित्य साधून पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादींना परत करण्याचा कार्यक्रम निगडी येथील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयात आज घेण्यात आला.

या समारंभात एकूण 84 वेगवेगळ्या गुन्ह्यातील 84 फिर्यादींना  त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. 679 ग्राम 590 मिलीग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व 739 ग्राम चांदीचे दागिने एकूण किंमत 33.43 लाख रुपये. तसेच एकूण 15 मोबाईल फोन किंमत रुपये 2.48 लाख रुपये, (Pimpri News) एक लॅपटॉप किंमत 20,000 रुपये, चार चाकी व दुचाकी वाहने असे एकूण 21 वाहने किंमत रुपये 51.50 लाख रुपये, सहा ऑटो रिक्षा किंमत 6.70 लाख रुपये, ब्रिज स्टोन कंपनीचे टायर ट्यूब किंमत रुपये 37.57 लाख रुपये व इतर मुद्देमाल किंमत रुपये 2.21 लाख. असे एकूण 1 कोटी 46 लाख 93 हजार 705 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीस आयुक्त चौबे यांच्या हस्ते फिर्यादींना परत करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.