Pune : कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया पुणे चॅप्टरच्या’च्या अध्यक्षपदी सीएमए नागेश भागणे

एमपीसी न्यूज : दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या (Pune) अध्यक्षपदी सीएमए नागेश भागणे यांची निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष सीएमए प्रसाद जोशी यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला. उपाध्यक्षपदी सीएमए निलेश केकाण, सचिवपदी सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली आणि खजिनदारपदी सीएमए राहुल चिंचोळकर यांची निवड झाली आहे.

व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून सीएमए हिमांशु दवे, सीएमए अमेय टिकले, सीएमए तनुजा मंत्रवादी, सीएमए अनुजा दाभाडे, सीएमए निखिल अगरवाल, विद्यार्थी प्रतिनिधी जयदीप माने देशमुख यांचा समावेश आहे. ही कार्यकारिणी 2023- 2027 या कालावधीकरिता आहे.

Yewalewadi : ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालयाला नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन

दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानत नागेश भागणे म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट अभ्यासक्रमाबद्दल जागरूकता (Pune) निर्माण करण्यासह या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी वाढवणे आणि पात्र विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याचे ध्येय आहे. सदस्यांसाठी आयपी, आरव्ही, इन्व्हेंटरी ऑडिट, सोशल ऑडिट आदी विषयांवर सत्रे, कार्यशाळा घेण्यावर भर दिला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.