NCP : ..अन्यथा आयुक्त कार्यालयात मोकाट श्वान सोडू; राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोकाट (NCP) श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेल महिला अध्यक्षा मनिषा गटकळ यांनी पालिकेकडे केली आहे. अन्यथा आयुक्त कार्यालयात मोकाट श्वान सोडले जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला, ओव्हर ब्रिजखाली, बेवारसी मोकट श्वान टोळक्याने एकत्र बस्तात. येणाऱ्या जाणऱ्या नागरिकांवर जोरात भुंकत धावून जातात, चावतात. नागरिक स्वतःला वाचवताना मोठमोठे अपघात होतात. त्यामुळे नागरिक गंभीर जखमी झालेले आहेत. त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिक सकाळी-संध्याकाळी वॉकिंगसाठी बाहेर पडतात, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी शाळे कॉलेज करीता जा-ये करतात.

Pune : कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया पुणे चॅप्टरच्या’च्या अध्यक्षपदी सीएमए नागेश भागणे

महिला कामगार आणि कामगार कर्मचारी कामानिमित्त शहरांच्या विविध (NCP) ठिकाणी ये जा करित असतात, तसेच इंडस्ट्रियल कंपन्यामध्ये कामगार वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे कामगार सकाळी, दुपारी आणि रात्रपाळी अशे शिफ्ट मध्ये कामे करुन टु-व्हिलर किंवा वाहनाने ये जा करीत असतात अशा या कर्मचारी वर्गावर बेवारसी मोकाट श्वाने अंगावर धावून येतात व चावतात एकत्रीत हल्ले करतात.

त्यामुळे शहरावर भितीचे वातावरण झाले आहे. यासदर्भात महापालिकाने ठोस पाऊले उचलावीत. शहरातील मोकाट श्वानंचा बंदोबस्त करावा. अन्यथा आयुक्त कार्यालयात मोकाट श्वान सोडले जातील असा इशारा त्यांनी दिला. यावेळी लता ओव्हाळ, विजया काटे, युसूफ कुरेशी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.