Oxygen park : कडबनवाडी येथे 1,400 झाडांची लागवड करत ‘ऑक्सिजन पार्क’ची निर्मिती

एमपीसी न्यूज : मागील नऊ महिन्यांपासून सुरु असलेल्या वृक्षलागवडीच्या अभियानांतर्गत 1 हजार 400 झाडांची लागवड करण्यात आली आहे. (Oxygen park) ही लागवड करत वन्यजीव प्रतिष्ठान, लायन्स क्लब ऑफ चिंचवड रॉयल यांच्या मार्फत ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात आली आहे.

ही लागवड कडबनवाडी येथील 30 एकरच्या परिसरात 5 डिसेंबर 2021 ते 11 सप्टेंबर 2022 या नऊ महिन्यांच्या कालावधीत करण्यात आली.(Oxygen park) पहिल्या दिवशी वन्यजीव प्रतिष्ठानचे संस्थापक भजनदास पवार, सचिव मुकुंद मावळणकर, खजिनदार सुभाष पागळे, विक्रम कुलकर्णी, संचालक सतीश गावडे, कौस्तुभ पवार, लायन्स क्लब चिंचवड रॉयलच्या अध्यक्ष वंदना उपेंद्र खांबेटे तसेच मनोहर पारळकर, विवेक देशपांडे, मंगेश मासाळ, दादासाहेब जाधव, सरपंच कांतिलाल गावडे, मनोहर गावडे, सतीश गावडे, बाबुराव गावडे, तात्या वडापुरे, राऊत वकी, करे वकील, राजू भोंग, जनार्दन पांढरमिसे, महेश गडदे, रामभाऊ भिडे, राजू खटके व कडबनवाडी ग्रामस्थ व लायन्स क्लब चिंचवड रॉयलचे सभासद उपस्थित होते.

Vedanta-Foxconn : ठाकरे सरकारच्या वसुली धोरणामुळेच वेदान्ता-फॉक्सकॉनचा ‘जय महाराष्ट्र’

यामध्ये वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, बहावा, फणस, करंजा अशा पारंपरिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांना ठिबक सिंचनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असून, परिसरात कुऱ्हाडबंदी,चराईबंदी केली आहे. त्यासाठी एक सुरक्षारक्षक ही नेमलेला आहे. (Oxygen park) या ऑक्सिजन पार्कची निर्मिती करणारे वन्यजीव प्रतिष्ठानचे काही सदस्य हे टाटा मोटर्सचे निवृत्त कामगार व अधिकारी आहेत. त्यांनी एकत्र येत या संस्थेची निर्मीती केली. या संस्थेमार्फत पर्यावरणविषयक उपक्रम राबवले जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.