Chakan : पार्क केलेल्या कारला कंटेनरची धडक

एमपीसी न्यूज – आळंदी फाटा चाकण येथे पार्क केलेल्या एका कारला कंटेनरने धडक दिली. त्यात कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना सोमवारी (दि. 14) रात्री घडली.

Pune : राज्यपाल रमेश बैस यांची पुण्यातील बाल कल्याण संस्थेला भेट

विठ्ठल विजय नाणेकर (वय 36, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्नील अर्जुन सोलनकर (वय 21, रा. सोरडी, ता. जत, जि. सांगली) यास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या कार (एमएच 14/जीएच 8987) मधून जात होते. आळंदी-चाकण रोडने जात असताना रस्त्यात ट्राफिक लागल्याने त्यांनी कार आळंदी फाटा येथे पार्क केली असता आरोपीने त्याच्या ताब्यातील कंटेनरने फिर्यादी यांच्या कारला धडक दिली. त्यात कारचे 25 हजारांचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण (Chakan ) पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.