Pcmc : जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड (Pcmc) महानगरपालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज टाळगाव चिखली येथे शाळेच्या भव्य प्रांगणात भारतीय स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट 2023, प्रभारी प्राचार्या स्नेहल पगार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

Chakan : पार्क केलेल्या कारला कंटेनरची धडक

यावेळी मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर माउलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी येथील मृदुंग महर्षी ह.भ.प.श्री अशोक महाराज पांचाळ उपस्थित होते. तसेच शाळेचे संचालक ह भ प. श्री राजु महाराज ढोरे हे देखील उपस्थित होते.

ह.भ.प. अशोक महाराज पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच काहीं विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त इंग्रजी व संस्कृत भाषेमध्ये भाषणे केली.

यावेळी ह.भ.प. अशोक महाराज पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तिरंगा ध्वजाचे महत्त्व आणि ‘संत साहित्याचे शिक्षण ही काळाची गरज’, हे विशद करून सांगितले, तसेच शाळेच्या प्रभारी प्राचार्या श्रीम. स्नेहल पगार यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेच्या संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सुचेता पुजारी आणि संस्कृत शिक्षक श्री सखाराम पितळे यांनी केले. पूर्व प्राथमिक विभागाच्या समन्वयिका श्रीम. मयुरी मुळूक यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे आणि पालकांचे आभार प्रदर्शन केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.