Pimpri: संतपीठ स्कूलमध्ये  पूर्व प्राथमिक विभागात ‘बाबा आणि मी’ हा कार्यक्रम व त्या निमित्त कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षक प्रबोधन ..

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित , (Pimpri)जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज   मध्ये पूर्व प्राथमिक विभागात ‘बाबा आणि मीं’ हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

त्यावेळी संतपीठ शाळेचे संचालक हरिभक्त परायण राजू महाराज ढोरे, शाळेचे प्राचार्य डॉ ज्ञानेश्वर गाडगे ,मुख्यध्यापिका स्नेहल पगार, समन्वयिका मयूरी मूळूक व  पालक प्रतिनिधीच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.

Pune : बाणेरकरांनी मनमुरादपणे लुटला फॅमिली वॉकेथॉनचा आनंद; भाजपाच्या वतीने आयोजित नमो करंडकला अभूतपूर्व प्रतिसाद

नर्सरी, ज्युनियर के.जी आणि सिनियर के जी. विद्यार्थी व त्यांचे  बाबा  यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यामध्ये पेपर फोल्डींग डान्स,  चायनिज विस्पर पुश अप विथ किड्स आणि रेस विथ किड्स याप्रकारचे खेळ घेण्यात आले. त्यावेळी उपस्थित पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

संतपीठ शाळेतील पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका सुवर्णा भोंगळे पौर्णिमा इंगळे, सविता गोडसे  , दिपीका पाटील, पूजा लोंढे,राणी कुसेकर, भारती भधाने, सुमन कोळेकर, सुनीता मंडलिक, पल्लवी मलकापुरे. यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ ज्ञानेश्वर गाडगे यांनी पालकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थांच्या जीवनातील पालकांचे  महत्व सांगितले. आभार प्रदर्शन पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका  शिल्पा सूर्यवंशी ,जयश्री बहिरट आणि श्रध्दा कुंभार यांनी केले.

सदर कार्यक्रमाचे निमित्त साधून शिक्षकांना व पालकांना प्रबोधन करण्यासाठी संतपीठाचे संचालक श्री. राजू महाराज ढोरे यांनी संत तुकाराम महाराजांच्या  अर्भकाचे साठी। पंतें हाती धरिली पाटी ।।  या अभंगातून शिक्षकांचे प्रबोधन केले.या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज म्हणतात विद्यार्थ्यांसाठी शिक्षक स्वतः हातात पाटी घेऊन त्यावर अक्षर गिरवतात तसेच माता देखील आपल्या बाळाच्या कलेने घेते आणि त्याची चाल जाणूनच त्या चालीने आणि हळुवारपणे पाऊल टाकते.

त्याचप्रमाणे संत सामान्य माणसांना समजावण्यासाठी, त्यांना मार्ग दाखवण्यासाठी स्वतः नियमाला धरून आचरण करतात .अंगी तसेच गुण बाळगतात. ज्याप्रमाणे नदी पार करण्यासाठी नाव स्वतः पाण्यात अखंड तरंगत राहून आपणास पैलतिरी नेते त्याचप्रमाणे संत समाजाला दिशा दाखवण्याचे काम करतात. असे अनेक दाखले देऊन सांगितले.

कीर्तनादरम्यान संतपीठ शाळेतील विद्यार्थ्यांनी याच अभांगावर नाटिकाही सादर केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात संतचरित्राचे  उदाहरण देऊन कसे शिकवावे यासाठी काही उदाहरणे दिली त्यामध्ये प्रामुख्याने प्रभू श्रीराम, भक्त प्रल्हाद यांच्या बालपणावर आधारित अभंग आणि आख्यायिका तसेच विद्यार्थ्यांच्या  जीवनातील शिक्षकांचे म्हणजेच गुरूंचे महत्वही विशद केले.

यासाठी संतपीठ शाळेतील सर्व शिक्षक टाळकरी म्हणून तसेच विवेक भालेराव यांनी तबला, विलास महाराज, गायत्री थोरबोले आणि पवन महाराज यांनी गायनाची साथ दिली. महेश शेळके व अविनाश भोगिल यांनी यांनी पखावज साथ केली.

तर चंद्रकांत गोसावी यांनी हार्मोनियम साथ केली. कीर्तनात विणेकरी म्हणून  भालचंद्र रोडे उपस्थित होते.

संतपीठाचे प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका स्नेहल पगार, समन्वयिका मयुरी मुळूक सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते. प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर गाडगे यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.