Pimpri : स्वातंत्र्य दिनी अग्निशमन दलातील आठ जणांचा सन्मान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अग्निशमन विभागातील (Pimpri)  आठ जणांचा विविध पदके देऊन सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी (दि.15) हा सन्मान पालिका आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला.

सेवानिवृत्त लीडिंग फायरमन तानाजी चिंचवडे यांना ‘सुरक्षित सेवापूर्ती पदक’ देण्यात आले. चिंचवडे 7 एप्रिल 1988 रोजी महापालिकेच्या अग्निशमन विभागात फायरमन म्हणून रुजू झाले होते. 30 जून 2023 रोजी ते 35 वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांनी आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडले त्याबद्दल त्यांना सुरक्षित सेवापूर्ती पदक देण्यात आले.

सेवानिवृत्त लीडिंग फायरमन अशोक इंगवले यांना ‘सुरक्षित सेवापूर्ती पदक’ देण्यात आले. इंगवले 12 फेब्रुवारी 1988 रोजी फायरमन म्हणून रुजू झाले. 35 वर्षाच्या सेवेनंतर ते 30 जून 2023 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांनी आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडले त्याबद्दल त्यांना सुरक्षित सेवापूर्ती पदक देण्यात आले.

लीडिंग फायरमन सुभाष लांडे यांनाही ‘सुरक्षित सेवापूर्ती पदक’ देण्यात आले. लांडे 16 जून 1990 रोजी फायरमन म्हणून रुजू झाले. 33 वर्षांच्या सेवेनंतर ते 31 मे 2023 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांनी आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडले त्याबद्दल त्यांना सुरक्षित सेवापूर्ती पदक देण्यात आले.

सिनियर फायरमन सोमनाथ तुकदेव यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ देण्यात आले. 20 मे 2023 रोजी दुर्गादेवी टेकडीवरील (Pimpri)  आग वर्दी पूर्ण करून प्राधिकरण उप केंद्रात परत येत असताना अग्निशमन वाहनाच्या इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने अग्निशमन वाहनाच्या केबिन मध्ये आग लागली. या विपरीत परिस्थितीत तुकदेव यांनी समयसूचकता दाखवून वाहनातील बॅटरी विद्युत पुरवठा खंडित केला. वाहनात असलेले तीन फायर एस्तिंग्युशर वापरून आग विझवली.

PCMC : यापुढे नियमानुसार नसलेल्या जाहिरात फलक मालकांवर कारवाईचा बडगा

याच वर्दीवर असलेले वाहन चालक लक्ष्मण बंडगर यांनी अग्निशमन वाहनाला आग लागताच परिसरातून बकेटच्या सहाय्याने पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे मोठे नुकसान तळले. याबद्दल लक्ष्मण बंडगर यांचा ‘अग्निशमन सेवा पदक’ देऊन सन्मान करण्यात आला.

2 ऑगस्ट रोजी पूरस्थितीत असलेल्या नदी पात्रात मधोमध अडकलेल्या व्यक्तीला वाचविण्यासाठी वाहन चालक प्रदीप भिलारे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. नदीपात्रात उडी घेऊन अडकलेल्या व्यक्तीची सुटका केली. याबद्दल त्यांना ‘अग्निशमन सेवा विशेष बचाव पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले.

लीडिंग फायरमन विठ्ठल सपकाळ यांना ‘अग्निशमन सेवा पदक’ देण्यात आले. 21 जून 2023 रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात गोतंडी गावात पालखी मुक्कामाच्या ठिकाणी लागलेल्या आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले. त्यांनी दाखवलेल्या या समयसूचकतेमुळे मोठी जीवित हानी टळली.

उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले यांना ‘अग्निशमन सेवा विशेष बचाव पदक’ देऊन गौरविण्यात आले. 21 जुलै 2023 रोजी प्राधिकरण येथील एका शाळेजवळ दलदलीत अडकलेल्या 65 वर्षीय व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. यावेळी इंगवले यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दलदलीत उतरून कर्तव्य (Pimpri)  बजावले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.