Hinjawadi : बस स्टॉपचे नुकसान केल्याप्रकरणी वीस जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – मराठा क्रांती मोर्चामध्ये बस स्टॉप, पत्र्याचे शेड आणि सरकारी वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी तीनच्या सुमारास कात्रज-देहूरोड बायपास रोडवर विवा हॉटेल समोर असलेल्या बसस्टॉप जवळ आणि बावधन येथील मराठा मंदिरासमोरील सार्वजनिक रोडवर घडली.
_MPC_DIR_MPU_II
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार संजय किसन दगडे (वय 49, रा. बावधन, ता. मुळशी), दिनेश वामन घोरपडे (वय 39, रा. श्रीकृष्णनगर, बावधन, ता. मुळशी), सचिन भीमराव ठेंगी (वय 31, रा. जांभूळकरनगर, हिंजवडी), सुभाष गणेश पोळेकर (वय 27), संजय गणेश पोळेकर (वय 31, दोघे रा. वेताळबाबा चौक, रामनगर, वारजे), हरीश जगदीश राजपूत (वय 38, रा. ए. आर. डी. ई. कॉलनी, पाषाण), सागर सोमनाथ गुरसाळे (वय 23, रा. यशोदीप चौक, वारजे), गणेश लक्ष्मण मुळे (वय 24, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरूड) आणि अन्य 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दुपारी तीनच्या सुमारास कात्रज-देहूरोड बायपासवर काही दुचाकीस्वारांनी आरडाओरडा करत विवा हॉटेल समोरील बसस्टॉपची तोडफोड केली. तसेच त्याच्या शेजारी असलेल्या पत्र्याचे शेडचे नुकसान केले. बावधन येथे पोलिसांच्या गाडीवर दगड मारून गाडीचे नुकसान केले. पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.