Actor Sonu Sood’s temple : कोरोना काळात लोकांना मदत करणाऱ्या अभिनेता सानू सूदचे तेलंगणामध्ये उभारलं मंदिर

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन मध्ये लोकांच्या मदतीला धावून गेलेल्या अभिनेता सोनू सूदचे सर्वच स्तरातून कौतूक झालं. सरकारने ठिकठिकाणी अडकलेल्या मजूरांना घरी जाण्यासाठी व्यवस्था केली नव्हती तेव्हाही सोनू सूद मजुरांना घरी पाठवण्यासाठी बसचं नियोजन केलं होतं. सिनेमातला व्हिलन ते रिअल लाईफमधला हिरो या शब्दात सोनूचं कौतुक झालं.

तेलंगणामधील सिद्दीपेट येथिल दुब्बा तांडा गावातल्या लोकांनी अभिनेता सोनू सूदचं मंदिर बांधलं आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

अभिनेता सोनू सूदने कोरोना साथीच्या काळात अनेक लोकांना मदत केली. त्यांचं मंदिर आम्ही बांधलं याचा अभिमान वाटतो, असे स्थानिक नागरिक सांगतात.

_MPC_DIR_MPU_II

सोनू सूदने स्व:खर्चातून कित्येक मजूरांना आपल्या घरी पोहचवले, तसेच विद्यार्थ्यांची सोय केली. पुण्यातील फायटर आज्जीला स्वत:ची ट्रेनिंग इन्स्टिटयूट उघडण्यास मदत केली. सोनूच्या लॉकडाऊन मधील कामाचं सर्वांनीच तोंडभरून कौतूक केलं.

तेलंगणात उभारलेल्या मंदिर सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय आहे. सोनूने मात्र याची काय गरज नव्हती पण मी भारावून गेलो असल्याचे म्हंटल आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.