Dapodi : दापोडी-फुगेवाडीतील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, युवासेनेची मागणी

एमपीसी न्यूज – फुगेवाडी -दापोडी -बोपखेल परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. या भटक्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी पिंपरी विधानसभा युवासेनेच्या पदाधिका-यांनी केली आहे.

याबाबत महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, फुगेवाडी-दापोडी-बोपखेल परिसरामध्ये भटक्या व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. नागरिकांवर हल्ला करणे, गाडयांचा पाठलाग करणे, चावा घेणे इत्यादी प्रकार घडत आहेत. विशेषकरून लहान मुलांना या कुत्र्यांचा धोका निर्माण झाला आहे. मोटार सायकल चालवणारे , सायकल चालवणारे व सकाळी जॉगिंगला जाणाऱ्या नागरिकांवर तसेच शाळेत जाणाऱ्या लहान मुलांवर ही भटकी कुत्री हल्ला करत आहेत. कुत्रा चावल्यास घ्यायला लागणाऱ्या लसीचा तुटवडा असल्यामुळे व अत्यंत महागडी औषधे असल्यामुळे नागरिकांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे .

_MPC_DIR_MPU_II

फुगेवाडी-दापोडी परिसरातील भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा. तसेच त्यांचे लसीकरण करण्यात यावे. नागरिकांची या दहशतीमधून मुक्तता करण्यात यावी. अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पिंपरी युवासेनेने दिला.

यावेळी युवती अधिकारी प्रतीक्षा घुले, विभागसंघटक निलेश हाके, शाखाप्रमुख प्रमोद शिंदे, मनोज काची, टोनी मकासरे, सुनील कदम, बाबू पाटील, उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.