Pimpri : सिगारेट पेटवताना शेकोटीत पडून वृद्ध होरपळला

एमपीसी न्यूज – तोंडात सिगारेट पकडून शेकोटीवर पेटविताना तोल गेल्याने एक वृद्ध शेकोटीत पडून गंभीररीत्या भाजला. ही घटना पिंपरीगाव येथे शनिवारी (दि. 12) रात्री घडली.

अशोक काशिनाथ जाधव (वय 66, रा. पिंपरी) असे भाजलेल्या वृद्धाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हे शनिवारी रात्री दारू पिऊन घरी चालले होते. त्यातच त्यांना सिगारेट पिण्याची तलफ आली. यामुळे तोंडात सिगारेट पकडून त्यांनी शेकोटीवर पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र दारू प्यायल्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते शेकोटीत पडले. या घटनेत ते 60 टक्‍के भाजले. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.