Pimpri : रोटरी क्लब ऑफ निगडीच्या रनेथॉनमध्ये धावले सात हजार स्पर्धक

आदित्य आर ठरला यंदाचा रनेथॉन विजेता

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या रनेथॉन ऑफ होप 2019 या स्पर्धेत आदित्य आर याने एक तास सतरा सेकंदांत मॅरेथॉन पूर्ण करुन प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत सात हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. निगडी, प्राधिकरणातील सेक्टर 27 येथील महापौर बंगल्यासाठी राखीव असलेल्या मैदानातून रविवारी सकाळी पावणेसहा वाजता स्पर्धेला सुरुवात झाली.
रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्यातर्फे  आयोजित करण्यात आलेल्या रनेथॉन ऑफ होप 2019 च्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत हजारो स्पर्धक सहभागी झाले होते.   या स्पर्धेची सुरुवात  सीस्का एलईडीचे उपाध्यक्ष अजय मेहरा व  ब्रीज स्टोनचे  कार्यकारी संचालक  अजय सावेकरी  यांच्या हस्ते दाखविण्यात आले. यावेळी  रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी,  डायरेक्टर  अण्णारे बिरादार, सचिव जगमोहन सिंग, डिस्ट्रिक्ट 3131चे  गव्हर्नर डॉ. शैलेश पालेकर आदी उपस्थित होते.  याशिवाय सॅण्डविक एशियाचे  सहर्ष डेविड, एसकेएफचे मनीष भटनाकर, एसकेएफच्या हेड सीएसआर सीमा सुमन, थरमॅक्सच्या हेड सीएसआऱ सुजाता देशपांडे, जीकेएन सिंटर मेटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उज्वल भट्टाचार्य, टाटा मोटर्सचे सुब्रतो, डबल ट्री बाय हिल्टनचे अमित घोष. जीईचे भरत कुमार, ओर्लीकॉन ब्लेझर कंपनीचे प्रवीण शिरसे,  फॅबेटेकचे आर.ए. रुपनर, टीजेएसबीचे धनंजय कुलकर्णी  आदी उपस्थित होते.
ही स्पर्धा चॅरिटी आणि स्पर्धा या दोघांचा संगम असून त्यात एकाच दिवशी 12 वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यती झाल्या. मुले- मुली तसेच स्त्री-पुरूष अशा चार वेगवेगळ्या वयोगटात स्पर्धा पार पडली. दुस-या टप्प्यात लहान मुलांच्या स्पर्धेला माजी उपमहापौर शैलजा मोरे, राजू मिसाळ यांनी फ्लॅग ऑफ दाखविण्यात आला.  ही स्पर्धा 12 ते 14 आणि 14 ते 16 या दोन वयोगटात झाली. याशिवाय अन्य वयोगटातही स्पर्धा झाली. यामध्ये 5 किमीची स्पर्धा खुल्या वयोगटासाठी तर 2 किमीची धर्मादाय स्पर्धा उद्योग क्षेत्रासाठी होती. नियोजनबद्ध व्यवस्था रोटरी क्लब ऑफ निगडीच्यावतीने करण्यात आली होती.
                                                                    
खेळाला प्रोत्साहन देऊन फिटनेस बाबत जागृती करणे यासह वेगवेगळ्या संस्थांमार्फत चालविण्यात येणा-या सोशल सर्व्हिस प्रोजेक्ट्साठी मदत निधी उभारणे हा रनेथॉनचा उद्देश आहे. गरजू व्यक्तींपर्यंत पोहचून त्यांच्या चेह-यावर हास्य फुलविणे हे यंदाच्या रनेथॉन फॉर होपचे घोषवाक्य होते. कार्यक्रमाचे नियोजन चांगले होते. लहान मुलांच्या प्रत्येक गटात दहा पारितोषिके देण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ मॅरेथॉन 2019 चा निकाल
# 21 किलोमीटर – 45 वर्षांपुढील
(पुरुष) – प्रथम प्रदीप रॉय, द्वितीय दिपक ओ, तृतीय जिओ थॉमस
(महिला) – प्रथम अंजली बालिंगे, द्वितीय लिलाम्मा अल्फोन्सो, तृतीय दुर्गा सिल
# 21 किलोमीटर – 45 वर्षाच्या आतील
(पुरूष) – प्रथम आदित्य आर, द्वितीय तानाजी नलावडे, तृतीय लक्ष्मण धायकर
(महिला) – प्रथम विनया मालसुरे, द्वितीय रेश्मा केवटे व नयन किर्तक, तृतीय स्वाती अग्रवाल

# 10 किलोमीटर – 45 वर्षांपुढील
(पुरुष) – प्रथम विश्वास चौघुले, द्वितीय शामपद दास, तृतीय रमेश चिविकर
(महिला) – प्रथम निशा बुला-मंडळ, द्वितीय उषा पाटील, तृतीय आकांक्षा जागी
# 10 किलोमीटर – 45 वर्षांच्या आतील
(पुरुष) – प्रथम प्राज गायकवाड, द्वितीय दिनकर लिलके, तृतीय बालाजी माने
(महिला) – प्रथम स्वाती उनावडे, द्वितीय वैष्णवी सावंत, तृतीय प्रियंका चावरकर
# 5 किलोमीटर – खुला
(पुरुष) – प्रथम रोहन जाधव, द्वितीय प्रकाश मावसकर, तृतीय जसविंदर सिंग
(महिला) – प्रथम वृषाली उत्तेकर, द्वितीय आकाश गायकवाड, तृतीय कृष्णा मावसकर
# 3 किलोमीटर – 14 ते 16 वर्ष
(मुले) – ओंकार पन्हाळकर, तोहीड कुरणे, अजित टोकरे, विनोद पडवळ, सिद्धेश चौधरी, गणेश कोळपे, महेश काकड, साहिल कोकणे, गौरव गायकवाड
(मुली) – शीतल भगत, निकिता बोंगार्डे, निकिता हजारे, साक्षी कुरंगी, विधिज्ञा कांबळे, दिपाली भंडाळ, साक्षी नवसरे, शिवानी कसडेकर, सारीका मुखाणे, नेहा राऊत
 # 2 किलोमीटर – 12 ते 14 वर्ष
(मुले) – आकाश टिपरे, केशव माने, साईराज कोळपे, करण भोये, आशिष वडु, अंकुश झिरवा, शैलेश सोमल, प्रशांत भोये, प्रयाग बिरवाई.
(मुली) – निकीता कोळी, वेदश्री लोहारी, किमया खेडेकर, तनिषा भांड, ऐश्वर्या हिंगे, तनुजा हांडे, रोशनी भुसुम, शेरवानी लिमन, वेदिका पुजारी, मुग्धा वाव्हळ, तनया चौधरी, तनुश्री कांबळे.
कार्पोरेट निकाल – एनप्रो, जीई, ओर्लीकॅन ब्लेझर या कंपन्यानी पारितोषिके पटकाविली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.