Dehugaon : राजकीय नेत्यांचे समाजात तेढ निर्माण करण्याचे स्वप्न साकार होऊ देऊ नका – मनोज जरांगे पाटील

एमपीसी न्यूज : मराठ्यांनो शांतता राखा, राजकीय (Dehugaon) नेत्यांचे समाजात तेढ निर्माण करण्याचे स्वप्न साकार होऊ देवू नका असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी आज देहूगाव येथील सभेत केले. छगन भुजबळ यांना व्यक्तीगत विरोध नव्हता, मात्र त्यांनी पातळी सोडल्याने त्यांना व्यक्तीगत विरोधही राहणार असेही जरांगे पाटील यांनी जाहीर केले. 

श्री क्षेत्र देहूगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आज मनोज जरांगे पाटील यांचे फटाक्य़ांच्या आतषबाजीत व फुलांची उधळण करीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. रात्री उशीर झालेला असतानाही परिसरातील सकल मराठा समाज त्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेसावध राहिलात तर न्याय मिळणार नाही –

सध्या ओबीसी नेते त्यांच्या समाजासाठी थेट बोलतात मग मराठा नेत्यांना व राजकारणी मंडळी हे मराठी मुलांसाठी थेट बोलले पाहिजे. नाहीतर भविष्यात समाज काय ते बोलेल. मराठ्यांनो भानावर या; स्वत;च्या मुलांच्या आयुष्य़ाची राखरांगोळी झाली. सावध रहा बेसावध राहु नका, बेसावध राहिलात तर न्याय मिळणार नाही. तुम्हाला दूरदृष्टी ठेवायला हवी.

मराठा आरक्षणाला विरोध केला की मी त्यांना भिडणार – जरांगे 

ज्याचे 40-40 वर्षे विचार पटत नव्हते ते राजकीय स्वार्थासाठी एका रात्रीत एकत्र आले. जर राजकीय मंडळी एकत्र येऊ शकतात तर तुमच्या लेकराच्या स्वार्थासाठी तुमचे मतभेद सोडून तुम्ही एकत्र का येत नाही? असा सवालही त्यांनी समाज बांधवांना यावेळी केला. मराठा समाजाचे नेते म्हणून त्यांनी सुमारे एक तास भाषण केले. यामध्ये त्यांनी सकल मराठा समाजाच्या तरूणांनी (Dehugaon) कोणत्याही प्रकारची मराठा आरक्षणाला विरोध केला की मी त्यांना भिडणार.

छगन भुजबळ यांना प्रतिउत्तर –

छगन भुजबळ यांच्यावर टिका करताना ते म्हणाले, की घटनेच्या पदावर बसलेला माणुस कायदा पायदळी तुडवायला लागला आहे. जातीजातीमध्ये तेढ कसा निर्माण होईल आणि जाती-जातीत तणाव कसा निर्माण होईल? यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. घटनात्मक पदावर बसलेला माणूस असे बोलू शकत नाही असे सांगत छगन भुजबळ यांचे आमचे वैचारीक मतभेत होते. . छगन भूजबळ यांच्यावर हल्ला चढविताना ते म्हणाले की छगन भूजबळ यांना व्यक्ती म्हणून विरोध नव्हता, मात्र त्यांनी ज्या प्रकारचे वक्तव्य केले आहे; त्यामुळे आता त्यांना आमचा व्यक्तीगत विरोध राहिल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.