Dehugaon : मराठा समाजाला आरक्षण देण्याची सद्बुद्धी सरकारला द्यावी; मनोज जरांगे यांची तुकोबाचरणी प्रार्थना

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला आरक्षण (Dehugaon ) देण्याची सद्बुद्धी सरकारला द्यावी, अशी प्रार्थना मनोज जरांगे पाटील यांनी तुकाराम महाराजांच्या चरणी केली. सोमवारी (दि. 20) मध्यरात्री त्यांनी देहूगावचा दौरा केला. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज मंदिरात तुकोबांचे दर्शन घेत साकडे घातले.

देहू सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे देहुनगरीत जंगी स्वागत करण्यात आले. जेसीबीमधून फुलांची उधळण करत त्यांचा सत्कार झाला. त्यानंतर जरांगे पाटील यांनी कोपरा सभा घेत समाज बांधवांना मार्गदर्शन केले.

जरांगे पाटील येणार असल्याने रविवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून देहूनगरीत मराठा बांधव जरांगे पाटील यांच्या आगमनाची वाट पाहत होते. मध्यरात्री त्यांचे आगमन झाले. त्यानंतर जरांगे पाटील यांना भलामोठा हार घालून त्यांचा सत्कार केला.

जरांगे पाटील म्हणाले, “जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या चरणी नतमस्तक झालो. मराठा समाजाला आरक्षण देण्याची सद्बुद्धी सरकारला द्यावी, हे साकडं तुकोबांच्या चरणी घातले. आरक्षण मिळण्याची संधी आली आहे. आंदोलनाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य मराठा समाजाने करू नये.

सरकारने आरक्षणा बाबत 24 डिसेंबर ही तारीख दिली आहे. 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण मिळाले नाही तर पुढची दिशा ठरवू. (Dehugaon ) मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. यापुढे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना योग्य भाषेत उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Dehugaon : राजकीय नेत्यांचे समाजात तेढ निर्माण करण्याचे स्वप्न साकार होऊ देऊ नका – मनोज जरांगे पाटील

ही सभा रात्री उशीरा दि़ड वाजे पर्य़ंत चालली. या वेळी देहू पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेकव योगेश काळोखे, प्रवीण काळोखे, सचिन हगवणे, स्वप्नील स्वप्नील काळोखे, अजित काळोखे, प्रशांत काळोखे, गोरख काळोखे, ओंकार काळोखे, विवेक काळोखे, सनी काळोखे, स्वप्नील हगवणे, सुदर्शन काळोखे, अमोल मोरे, किशोर आवळे, बंटी मुसुडगे, अनिकेत काळोखे, गणेश मराठे, निखील मराठे, शुभम शेवाळे, दिपक काळोखे व सकल मराठा समाजाने केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.