Dehugaon : ‘त्या’ बाप लेकीची आत्महत्या; देहूगाव येथील घटनेबाबत पोलिसांचे निरीक्षण

एमपीसी न्यूज – इमारतीच्या आठव्या मजल्याच्या डकमधून (Dehugaon) पडून अडीच वर्षांच्या मुलीसह वडिलांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 27) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास इंद्रायणी वाटिका इमारतीमध्ये देहूगाव येथे घडली.

रमेश मारुती लगड (वय 34 , रा. इंद्रायणी वाटिका, देहूगाव, मूळ रा. पिंपळसुटी, ता. शिरूर, पुणे), मुलगी श्रेया रमेश लगड (वय अडीच वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश लगड हे लष्कराच्या सेन्ट्रल ऑर्डनन्स डेपो (सीओडी) मध्ये नोकरी करत होते. रमेश यांनी देहूगावात इंद्रायणी नदीच्या किनारी असलेल्या इंद्रायणी वाटिका या इमारतीत आठव्या मजल्यावर घर घेतले होते. मागील दीड वर्षांपासून रमेश, त्यांची पत्नी आणि मुलगी असा तिघांचा परिवार तिथे राहत होता.

Maharashtra : विहिरी, भूपृष्ठावरील जलासह उपसा सिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर; देशात लघुसिंचन योजनांमध्ये राज्य दुसऱ्या क्रमांकावर

रविवारी दुपारी बाराच्या सुमारास रमेश इमारतीखाली मुलीसोबत खेळत होते. खाली खेळून झाल्यानंतर ते आठव्या मजल्यावर असलेल्या घराजवळ गेले. तिथून रमेश आणि त्यांची मुलगी श्रेया डकमधून खाली पडले. गंभीर जखमी होऊन दोघांचा त्यात मृत्यू झाला. या घटनेचा धक्का सहन न झाल्याने रमेश यांची पत्नी बेशुद्ध पडल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रमेश राहत असलेल्या मजल्यावर डकच्या भिंतीची उंची सुमारे तीन फूट आहे. त्यामुळे तिथून तोल जाऊन पडणे शक्य नाही. तसेच रमेश आणि त्यांची मुलगी हे एकाच वेळी खाली पडले आहेत. त्यामुळे त्यांना ढकलून देण्याचा प्रयत्न झाला असेल याबाबत शंका उत्पन्न होत नाही.

आतापर्यंतच्या निरीक्षणातून ही आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. आत्महत्या केली तर त्याचे कारण काय, हेही समोर येणे आवश्यक आहे. सर्व शक्यता पडताळून देहूरोड पोलीस तपास करीत (Dehugaon)आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.