Talegaon Dabhade : तळेगावात भरला रानभाज्यांचा महोत्सव

एमपीसी न्यूज – भोकर, कर्टूले, चिचारडी,भारंगी, शेवग्याचा पाला, (Talegaon Dabhade) हिरवी पपई,घोसाळे,घोळ,कुसर, सांबरवेल,पुनर्नवा,मायाळु,हाडसंधी, टाकळा,चांगेरी,आघाडा,फोडशी अशा अनेक रान भाज्यांचा महोत्सव तळेगाव येथे भरला. रोटरी क्लब तळेगांव दाभाडे, फोना, आयुर्वेद व्यासपीठ पिंपरी चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले.
वैद्य ज्योती मुंडर्गी यांनी आरोग्यदायी रानभाज्यांचे व्यावहारिक व दैनंदिन प्रॅक्टिसमधील उपयोग या विषयावर मार्गदर्शन केले. केवळ शोधन आणि शमन चिकित्सेपेक्षा आहारातील मार्गदर्शन व बदल देखील व्याधी निवारणामध्ये किती महत्त्वाची भूमिका निभावतात याचे विवेचन मुंडर्गी यांनी केले.
कार्यक्रमासाठी पुणे,कोथरूड,पिंपरी चिंचवड येथील वैद्य,रोटरियन्स,निसर्ग प्रेमी उपस्थित होते. केवळ शोधन आणि शमन चिकित्सेपेक्षा आहारातील मार्गदर्शन व बदल देखील व्याधी निवारणामध्ये किती महत्त्वाची भूमिका निभावतात याचे अप्रतिम विवेचन मुंडर्गी यांनी केले.आयुर्वेदाच्या या अतिशय महत्वाच्या  विषयायवर सहजसोप्या शब्दात त्यांनी मार्गदर्शन केले.
भोकर,कर्टूले,चिचारडी,भारंगी, शेवग्याचा पाला, हिरवी पपई, घोसाळे,घोळ,कुसर,सांबरवेल, पुनर्नवा,मायाळु,हाडसंधी,टाकळा, चांगेरी,आघाडा,फोडशी या रानभाज्यांची अतिशय विस्तृत माहिती सांगितली.
व्याख्यानातील काही विशेष माहिती

1. सर्वच रानभाज्या शरीरातील अतिरिक्त टाॅक्झीन्स बाहेर काढण्यात मदत करतात, 2. कर्टूले, घोसाळे, मायाळु, फोडशी या रानभाज्यांचे रसधातू वर विशेष कार्य, 3. शेवग्याच्या पाला – दारुणक, हिरवी पपई चिक- जळवात व स्तन विद्रधी, घोळ – मुत्रदाह, घामोळे, सांबरवेल- व्रणरोपक, मांस धातु बळकटी, मायाळु- hormonal imbalance, हाडसंधी- भग्नसंधानकर,
टाकळा- Anti fungal properties.
उदाहरणादाखल विविध केसेस  मांडल्या गेल्या . रानभाज्यांची सहज सोपी पाककृती व हे व्याख्यान दैनंदिन विषयांपेक्षा काहीतरी वेगळे, ज्ञानात भर घालणारे आणि विचारांना चालना देणारे होते.
विशेष आकर्षण म्हणजे  खरपुड गावातील 15 आदिवासी महिलांनी अतिशय कष्ट घेऊन बनवलेले अप्रतिम जेवण. यात 15 प्रकारच्या रानभाज्या, 4 प्रकारच्या भाकऱ्या व 2 प्रकारचे भात अशा चविष्ट जेवणाचा आस्वाद सर्वांनी  घेतला.
वैद्य नितीन देसाई सर, वैद्य अमृते मॅडम यांनी स्वतःचे रानभाजी वापरून केलेल्या चिकित्सेचे अनुभव सांगितले. वैद्य कीर्ती जाधव यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी अतिशय चोख बजावली.
वैद्य प्रणाली कासवा यांनी या कार्यक्रमाच्या नोंदणी विभागाचे काम पाहीले.वैद्य मुंडर्गी मॅडम, वैद्य लता पुणे, वैद्य अपूर्वा मुंडर्गी, वैद्य कोमल गायकवाड यांनी व्यवस्थापनाचे काम पाहिले.
कार्यक्रमाच्या मध्यंतरात रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडेचे अध्यक्ष रो. उद्धव चितळे,डॉ गणेश सोरटे,फोनाचे अध्यक्ष निरंजन श्याही यांनी आपले मनोगत व्यक्त करून या कार्यक्रमाचे महत्त्व विषद केले. तसेच डॉ.गणेश सोरटे यांच्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी खरपुड गावाच्या 15 आदिवासी स्त्रियांना साडीचोळी देवून त्यांचा (Talegaon Dabhade) सन्मान केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.