Talegaon Dabhade : तळेगाव स्टेशन विभागातील तळे परिसरात वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, महिंद्रा ॲक्सीलो लि.कान्हे, महिंद्रा स्टील सर्विस सेंटर कान्हे ( Talegaon Dabhade ) व तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक व विलोभनीय नैसर्गिक सौंदर्य असलेल्या स्टेशन विभागातील तळे परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अभिनेत्री सविता मालपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मालपेकर यांनी रोटरीच्या कामाचे कौतुक केले.
महिंद्रा ॲक्सीलो कंपनीचे सीईओ दिवाकर श्रीवास्तव यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संगोपन करणे काळाची गरज आहे तसेच रोटरी सिटी करत असलेल्या विविधांगी उपक्रमांचे कौतुक करत रोटरी सिटीला आपण सदैव मदत करणार असल्याचे आपल्या मनोगताद्वारे जाहीर केले तर गेल्या दोन महिन्यात समाजाला अत्यंत उपयुक्त असणारे 24 प्रकल्प रोटरी सिटीने राबवले हे सांगताना अध्यक्ष सुरेश शेंडे यांनी रोटरी सिटीची माहिती दिली.
आरोग्याच्या दृष्टीने तळेगावची हवा अत्यंत अल्हाददायक आहे. तळेगावच्या ऐतिहासिक व नैसर्गिक सौंदर्यात रोटरी सिटी महिंद्रा कंपनीच्या साहाय्याने भर घालत आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री सविता मालपेकर यांनी केले.

संस्थापक अध्यक्ष रो.विलास काळोखे, तळेगाव नगरपरिषदेच्या उपमुख्य अधिकारी ममता राठोड, माजी नगराध्यक्ष रो.सुरेश धोत्रे,वृक्ष विभाग प्रमुख श्री महाजन, सी.आर.पी.एफ.चे अनिल कोलते, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले,रोटरीचे मा.अध्यक्ष रो.दीपक फल्ले यांनी सदर प्रसंगी पर्यावरणाचे महत्त्व कथन व उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी रो.सुरेश धोत्रे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो.प्रसाद पादीर यांनी केले सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख रो.प्रदीप टेकवडे यांनी केले तर आभार सेक्रेटरी रो.भगवान शिंदे यांनी मानले.
रो.संजय मेहता, रो.संजय चव्हाण, रो.निखिल महापात्रा,रो.संतोष परदेशी, सह प्रकल्प प्रमुख रो.तानाजी मराठे,रो.प्रशांत ताये,रो.शरयू देवळे, रो.रामनाथ कलावडे,रो.डॉ.धनश्री काळे, रो.रघुनाथ कश्यप,रो. विश्वास कदम, महिंद्रा ॲक्सीलो कंपनीचे अधिकारी निवास गंधाळे,जगदीश परब, विश्वजीत डे,राजू तुपारे, प्रवीण पाटील,अभिजीत जाधव, सुमित भडोरिया,हरीश कुचेकर, नितीन वेदपाठक, आनंद पोटभरे, तळेगाव नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम ( Talegaon Dabhade ) घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.