Pune : कसब्याचा हक्काचा निधी परत द्या ; अन्यथा चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करणार – रवींद्र धंगेकर

एमपीसी न्यूज -राज्य सरकार मार्फत कसबा विधानसभा मतदारसंघातील (Pune) पायभूत सुविधा करिता 10 कोटींचा निधी मंजूर झाला होता.मात्र तो निधी अचानकपणे पर्वती मतदारसंघामध्ये वळविण्यात आला आहे.यामागे भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे असून कसबा विधानसभा मतदारसंघासाठी लवकरात लवकर 10 कोटींचा निधी न दिल्यास चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.

यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले की, कसबा विधानसभा पोटनिवडणुक होऊन जवळपास सात महिन्याचा कालावधी होऊन गेला. त्या काळात मी राज्य सरकारकडे जवळपास 100 काम सुचविली होती. त्यासाठी 10 कोटींचा निधी देखील मंजूर झाला होता. पण तो निधी अचानकपणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघात वळविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Talegaon Dabhade : तळेगाव स्टेशन विभागातील तळे परिसरात वृक्षारोपण

या कृतीमधून भाजपच्या नेत्याकडून कुरघोडीचे राजकारण सुरूच आहे. या कृतीचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. तुम्ही माझा अपमान करा, तो मी अपमान सहन करेन पण मी माझ्या मतदार संघातील नागरिकांचा अपमान सहन करणार नाही. त्यामुळे शहरातील ज्या ठिकाणी चंद्रकांत पाटील कार्यक्रमासाठी जातील , त्या ठिकाणी मी आंदोलन करून जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते म्हणाले , या सर्व प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी लक्ष घालून निधी बाबत निर्णय घ्यावा,अशी मागणी केली आहे. पण त्यांनी लवकरात लवकर लक्ष घालून निर्णय न घेतल्यास चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील घराबाहेर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी (Pune) दिला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.