Dehuroad : व्हिडिओ रिव्ह्यू टास्क देत दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – व्हिडिओ रिव्ह्यू टास्क देत एका (Dehuroad) व्यक्तीची दीड लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी सातारा जिल्ह्यातील भोळी, ता. खंडाळा येथे घडली.

केशवराव तानाजी पवार (वय 38, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मूळ गावी भोळी, ता. खंडाळा, जि. सातारा येथे असताना आरोपी महिलांनी फिर्यादी यांना टेलिग्रामवर एक लिंक पाठवली. त्यानंतर फिर्यादीस एक मेसेज पाठवून व्हिडीओचा रिव्ह्यू टास्क दिला.

Pimpri : संदीप वाघेरे युवा मंच आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा उत्साहात

तो टास्क पूर्ण केल्यानंतर फिर्यादीस सुरुवातीला बक्षीस देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून वेगवेगळ्या कारणांसाठी एक लाख 58 हजार रुपये घेत त्या पैशांचा अपहार करत फिर्यादी यांची फसवणूक केली.

हा प्रकार सातारा जिल्ह्यातील (Dehuroad) शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा दाखल करून देहूरोड पोलिसांनी शिरवळ पोलिसांकडे वर्ग केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.