Dighi : शेतातून दोन चंदनाची झाडे चोरीला; एकास अटक

एमपीसी न्यूज – चऱ्होली बुद्रुक येथे गणेश भोसले यांच्या शेतातून दोन चंदनाची झाडे चोरीला गेली. याप्रकरणी पोलिसांनी एका चोराला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 16) दुपारी एक वाजता घडली.

Moshi : फर्निचर व्यावसायिकाची 84 लाखांची फसवणूक

अनिल दत्तोबा दुधावडे (वय 25), विशाल नटराज दुधावडे (वय 25), अंकुश पारधी (वय 22, सर्व रा. धावडी निमगाव, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल दुधावडे याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी गणेश पोपट भोसले (वय 37, रा. भोसले वस्ती, चऱ्होली बुद्रुक) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेतात विनापरवाना प्रवेश करून आरोपींनी तीन वर्ष जुनी चंदनाची दोन झाडे तोडली. त्यातील दोन झाडांचा 15 हजार रुपये किमतीचा आतील गाभा चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

शहरातील विविध भागातून चंदनाची चोरी

निगडी येथील दुर्गाटेकडीवरून अज्ञातांनी एक चंदनाचे झाड चोरून नेले. दुर्गादेवी टेकडीसाठी कायम सुरक्षा रक्षक तैनात असतात. असे असतानाही चोरट्यांनी टेकडीवरून चंदनाचे झाड चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान मागील आठवड्यात गोखले पार्क चिंचवडगाव येथून देखील चंदनाचे झाड चोरीला गेले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.