Moshi : फर्निचर व्यावसायिकाची 84 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फर्निचर व्यावसायिकाची फर्निचर कंपनीतील दोन कामगारांनी 84 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 1 जून 2021 ते 20 जून 2023 या कालावधीत द किचन स्टोरी (Moshi) या कंपनीत घडली.

Hinjawadi : कासारसाई येथे शेतातून दीड लाखांचे साहित्य चोरीला

संजय हरिप्रसाद वर्मा (वय 46, रा. पुनावळे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल तिवारी (वय 28), रोहित कुमार तिवारी (वय 2, रा. मोशी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मोशी येथे द किचन स्टोरी नावाची कंपनी आहे. या कंपनीत आरोपी राहुल हा कंपनी इन्चार्ज तर आरोपी रोहीतकुमार हा स्टोअर इन्चार्ज म्हणून दोन वर्षांपासून नोकरी करीत आहेत. आरोपींनी कंपनीचा कच्चा माल वापरून आठ ते दहा किचन बनवून त्याची परस्पर विक्री केली.

लेबर लोकांनी रात्रपाळी केली असल्याचे सांगत फिर्यादीकडून आरोपींनी पैसे घेतले. ते पैसे कामगारांन न देता ते स्वतःकडे ठेवले. कंपनीतील माल विकून आलले पैसे आरोपींनी स्वताच्या बँक खात्यावर घेत फिर्यादी यांची एकूण 84 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.